उच्चभ्रू सोसायटी बनतेय अपहरणकर्त्यांचे टार्गेट, एका महिन्यांत घडल्या दोन घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 01:04 AM2018-11-17T01:04:30+5:302018-11-17T01:05:00+5:30

शहर हादरले : एका महिन्यांत घडल्या दोन घटना, कमी वेळेत जादा पैसे कमाविण्याची तरुणांमध्ये क्रेझ

The hijab society created hijackers' targets, two events in one month | उच्चभ्रू सोसायटी बनतेय अपहरणकर्त्यांचे टार्गेट, एका महिन्यांत घडल्या दोन घटना

उच्चभ्रू सोसायटी बनतेय अपहरणकर्त्यांचे टार्गेट, एका महिन्यांत घडल्या दोन घटना

Next

पिंपरी : खंडणीसाठी मुलांचे अपहरण करण्याच्या घटना शहरात घडू लागल्या आहेत. केवळ कमी कालावधीत जादा पैसे मिळविण्याच्या उद्देशाने अपहरणासारखे गंभीर गुन्ह्याचे कृत्य करणारे नवखे आरोपी अशा घटनांमध्ये पोलिसांच्या जाळ्यात अडकत आहेत. दिवाळीच्या पंधरा दिवसांत दुसरी घटना चिंचवडमधील उच्चंभ्रू सोसायटीसमोर गुरुवारी घडली.

पिंपरी-चिंचवड शहरातील पोलिसांनी पाच लाखांच्या खंडणीची मागणी करून तरुणीला पळवून नेण्याची धमकी देणारे आरोपी सप्टेंबरमध्ये पोलिसांनी पकडले. त्यानंतर सात नोव्हेंबरला थेरगाव येथील एका व्यावसायिकाच्या सुफियान या पाच वर्षांच्या मुलाची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून पोलिसांनी सुटका केली.

मोहम्मद शकील सलीम खान (वय ३२, रा. मुंबई), शारुख मिरज खान (वय २६, वाल्हेकरवाडी) अशी त्या आरोपींची नावे आहेत. दोघेही नात्याने साडू. एकाचे त्याच परिसरात अंडी विक्रीचे दुकान होते. सुफियानच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती त्यांना चांगलीच माहिती होती. या मुलाचे अपहरण केल्यास व्यावसायिक असलेल्या त्याच्या वडिलांकडून मोठी रक्कम सहज उकळता येईल, असा त्यांचा उद्देश होता. एकाला कर्ज फेडण्यासाठी दोन ते अडीच लाख रुपयांची गरज होती.

पंधरा लाख स्वीकारण्याची आरोपींची तयारी
चिंचवडमधील उच्चभ्रू सोसायटीतील मुलीचे अपहरण करणारे आरोपी हे सर्वसाधारण कुटुंबातील आहेत. जितेंद्र बंजारा आणि नितीन गजरमल या दोन आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. बंजारा हा हिंजवडी परिसरात डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो, तर नितीन गजरमल तेथील चित्रपटगृहात काम करतो. आलिशान सोसायटीतील एखाद्या मुलाला पळवून नेऊन त्यांच्या पालकांकडे खंडणी मागायची, या उद्देशाने ते चिंचवड येथील क्विन्स सिटी या सोसायटीत सलग सात दिवस मोटार घेऊन येत होते. गुरुवारी सोसायटीतून पेन खरेदी करण्यासाठी रस्त्यावर आलेली मुलगी त्यांना दिसली. तिला मोटारीत घेऊन ते पसार झाले. आई-वडिलांचा मोबाइल क्रमांक आरोपींनी तिच्याकडूनच घेतला. त्यानंतर खंडणीच्या मागणीसाठी संपर्क साधला. ५० लाखांची खंडणी मागितली. १५ लाख रुपये रक्कम स्वीकारण्यास ते तयार झाले. सराईत नसल्याने आरोपी काही तासांतच पोलिसांच्या हाती लागले.

हॉटेल सुरू करण्यासाठी खंडणीतून पैसे
अपहरण करणारे दोन्ही आरोपी बालमित्र आहेत. जितेंद्र बंजारा हा डिलिव्हरी बॉय म्हणून, तर नितीन गजरमल हा चित्रपटगृहात काम करीत होता. दोघांनी हॉटेल सुरू करण्याचा निश्चय केला. परंतु त्यासाठी त्यांना मोठ्या रकमेची गरज होती. कोणाचे तरी अपहरण करून खंडणीतून रक्कम उभी करण्याच्या इराद्याने त्यांनी माहीचे अपहरण केले.
आईस्क्रीम, गुलामजाम नाही खाल्ले
४माहीला अपहरणकर्त्यांनी खोलीत डांबून ठेवले होते. तिला गुलाबजाम, आइस्क्रीम खाण्यास दिले. मात्र त्यात गुंगीचे औषध असण्याची शक्यता लक्षात घेऊन तिने खाण्यास नकार दिला. माहीने सांगितले, की अपहरणकर्त्यांनी कसलीही इजा पोहचवली नाही. घरची सांपत्तिक स्थिती विचारण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र त्यांना खोटे सांगितले. पोलीस पथक आले. अपहरणकर्त्याच्या तावडीतून त्यांनी सुटका केली. त्यानंतर पोलीसकाकांना खाण्यासाठी बिस्कीट मागितले. बेतलेल्या प्रसंगाला अत्यंत धैर्याने कसे तोंड दिले, हे ऐकून उपस्थितांनी माहीचे कौतुक केले.

मोटारीची
आॅनलाइन खरेदी
४आरोपींनी गुन्ह्यासाठी जुनी मोटार आॅनलाइन खरेदी केली. एवढेच नव्हे, तर मारुंजीतील सदनिका भाड्याने घेतली, त्याचा व्यवहारसुद्धा त्यांनी आॅनलाइन केला. अनामत रक्कम आणि भाडे आॅनलाइन देऊन त्यांनी एक्झर्बिया सोसायटीतील सदनिका भाड्याने घेतली होती. सातारा येथील तांबे नावाच्या वकिलाच्या मालकीची ती सदनिका आहे.
सोसायट्यांची सुरक्षा यंत्रणा कुचकामी
४सोसायट्यांमधील सुरक्षा यंत्रणा कुचकामी असल्याचे निदर्शनास आले. सीसीटीव्ही कॅमेऱ्याची दिशा,यंंत्रणा सुस्थितीत आहे की नाही, अनोळखी व्यक्ती-वाहन परिसरात येते. याबाबत कोणी सतर्कता दाखवत नाही. नागरिक बेजबाबदार असल्याचेच यातून निदर्शनास आले आहे. यापुढे सोसायट्यांच्या सुरक्षिततेबाबत पोलीस यंत्रणा अधिक लक्ष घालणार आहे, असेही आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी सांगितले.
 

Web Title: The hijab society created hijackers' targets, two events in one month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.