हिंजवडीतील प्रायोगिक तत्त्वावरील चक्राकार एकेरी वाहतूक कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 01:15 AM2018-11-28T01:15:19+5:302018-11-28T01:15:38+5:30

आयटीनगरी म्हणून जगाच्या नकाशावर ओळख असलेल्या पुण्याजवळील हिंजवडीच्या वाहतूककोंडीचा प्रश्न जटिल झाला होता.

Hingvadi's experimental ring continued with single traffic | हिंजवडीतील प्रायोगिक तत्त्वावरील चक्राकार एकेरी वाहतूक कायम

हिंजवडीतील प्रायोगिक तत्त्वावरील चक्राकार एकेरी वाहतूक कायम

Next

पिंपरी : आयटीनगरी म्हणून जगाच्या नकाशावर ओळख असलेल्या पुण्याजवळील हिंजवडीच्या वाहतूककोंडीचा प्रश्न जटिल झाला होता. पिंपरी-चिंचवडला नव्याने झालेल्या पोलीस आयुक्तालयात रुजू झाल्यानंतर पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी हिंजवडी, वाकड येथील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यास प्राधान्य दिले. सप्टेंबरमध्ये आयटी अभियंते, हिंजवडी ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधून वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल केले. चक्राकार एकेरी वाहतूक असाही प्रयोग केला. नागरिकांच्या सूचना, हरकती जाणून घेतल्या. या बदलामुळे ही समस्या सोडविण्यास मोठ्या प्रमाणावर यश आले. त्यामुळे सप्टेंबरमध्ये करण्यात आलेली चक्राकार एकेरी वाहतूक व्यवस्था कायम ठेवण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे.


शिवाजी चौकातून डावीकडे वळून विप्रो सर्कल फेज १ येथून उजवीकडे वळून जॉमेट्रिक सर्कल चौक येथून वाहनांना इच्छितस्थळी जाता येईल. शिवाजी चौकात येणाऱ्या आयटी कंपन्यांच्या बसगाड्या, तसेच इतर जड वाहने यांना वाकड पुलाकडे जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. शिवाजी चौकातून उजवीकडे वळण्यास, तसेच यू टर्न घेण्यास वाहनांना मनाई करण्यात आली आहे. शिवाजी चौकातून डावीकडे वळून कस्तुरी चौकातून पेट्रोल पंप चौकातून इच्छितस्थळी जाता येईल.


जांभूळकर जीम, पेट्रोल पंपाजवळील आऊट मर्ज स्थानिकांसाठी खुला ठेवण्यात येणार आहे. इंडियन आॅईल पेट्रोल पंप ते शिवाजी चौकादरम्यान आऊट मर्ज, तसेच शिवाजी चौक ते फेज १ सर्कल डिव्हायडर पंक्चर, फेज १ ते जॉमेट्रिक सर्कल दरम्यानचे डिव्हायडर पंक्चर, मेझ्झा ९ ते शिवाजी चौक दरम्यानचे डिव्हायडर पंक्चर बंद करण्यात आले आहेत. भूमकर चौकातून शिवाजी चौकाकडे येणाºया वाहनांना उजवीकडे वळण्यास मनाई केली आहे. वाहनांनी शिवाजी चौकातून सरळ विप्रो सर्कल फेज १ येथून सरळ पुढे जावे.


मेझ्झा ९ चौकातून वाहनांना उजवीकडे वळण्यास मनाई केली आहे. माणगाव रस्त्याने विप्रो सर्कल फेज २ चौकातून शिवाजी चौकाकडे सरळ जाण्यास बंदी करण्यात आली आहे. सर्व वाहनांनी डावीकडे वळून जॉमेट्रिक सर्कल येथून इच्छितस्थळी जावे. फेज २, ३ कडून येणाºया सर्व प्रकारच्या वाहनांना जॉमेट्रिक सर्कलच्या चौकातून उजवीकडे वळण्यास मनाई केली आहे. वाहनांनी शिवाजी चौकातून जावे, असे परिपत्रक वाहतूक विभागाने काढले आहे.

Web Title: Hingvadi's experimental ring continued with single traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.