ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 06:33 AM2017-07-27T06:33:59+5:302017-07-27T06:33:59+5:30
संख्याबळाअभावी मागील वर्षभरापासून प्रशासकाद्वारे चाललेला हिंजवडी ग्रामपंचायतीचा कारभार यापुढेदेखील सुरूच राहणार आहे.
हिंजवडी : संख्याबळाअभावी मागील वर्षभरापासून प्रशासकाद्वारे चाललेला हिंजवडी ग्रामपंचायतीचा कारभार यापुढेदेखील सुरूच राहणार आहे. नाट्यमय घडामोडीनंतर जिल्हाधिकारी सौरभ राव यांना नियोजित सरपंच-उपसरपंच निवडणूक अखेर रद्द करावी लागली.
हिंजवडी ग्रामपंचायतीचे निम्म्याहून अधिक सदस्य अपात्र ठरले असताना प्रशासनाकडून जिल्हाधिकाºयांना चुकीची माहिती देण्यात आल्याने जिल्हाधिकाºयांकडून गुरुवारी (ता.२७) लावण्यात आलेली हिंजवडी ग्रामपंचायत निवडणूक रद्द करण्यात आली.
सतरापैकी नऊ सदस्य अपात्र ठरल्याने अल्पमतात राहिलेल्या हिंजवडी ग्रामपंचायतीतील केवळ आठ सदस्यांमध्येच निवड प्रक्रिया केली जाणार होती. अपात्र ठरलेल्या सदस्यांच्या जागी पोटनिवडणूक घेण्याऐवजी थेट सरपंच-उपसरपंचाची निवडणूक का लावली याचे गौडबंगाल ग्रामस्थांना उमगले नाही.