हिंजवडीत पेट्रोल पंप मालकाची ६६ लाखांची फसवणूक; मॅनेजर असलेल्या दोघांविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 10:43 AM2022-03-03T10:43:18+5:302022-03-03T10:47:34+5:30

हिंजवडी-वाकड रस्त्यावरील पेट्रोल पंपावरील प्रकार...

hinjewadi petrol pump owner cheated of 66 lakh crimes against both managers | हिंजवडीत पेट्रोल पंप मालकाची ६६ लाखांची फसवणूक; मॅनेजर असलेल्या दोघांविरोधात गुन्हा

हिंजवडीत पेट्रोल पंप मालकाची ६६ लाखांची फसवणूक; मॅनेजर असलेल्या दोघांविरोधात गुन्हा

googlenewsNext

पिंपरी : मॅनेजर असलेल्या दोघांनी पेट्रोल पंपच्या टॅंकमधून टेस्टिंगसाठी काढलेल्या पेट्रोल व डिझेलची चोरी केली. तसेच बोगस ग्राहकांच्या नावे खाते बुक तयार करून त्याचा वापर करून रोख रक्कम स्वीकारली. यात पेट्रोल पंपच्या मालकाची एकूण ६६ लाख ५७ हजार ३९८ रुपयांची फसवणूक केली. समर्थ सर्विस स्टेशन, हिंजवडी येथे एप्रिल २०१९ ते एप्रिल २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला. 

प्रवीण संपत पवार, संतोष बाबाजी आरण (रा. थेरगाव) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मोहिनी महेश सोंडेकर (वय ४०, रा. संत नगर, मोशी प्रधिकरण) यांनी या प्रकरणी बुधवारी (दि. २) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा हिंजवडी येथे हिंजवडी -वाकड रस्त्यावर समर्थ सर्विस स्टेशन या नावाचा पेट्रोल पंप आहे. आरोपी हे या पेट्रोल पंपावर मॅनेजर होते. आरोपींनी संगणमत करून फिर्यादी यांना कोणतीही माहिती न देता त्यांच्या परस्पर अंडरग्राउंड टॅंकमधील पेट्रोल व डिझेल टेस्टिंगसाठी काढले. टेस्टिंग झाल्यानंतर ते पुन्हा टॅंकमध्ये न टाकता त्याची चोरी करून परस्पर दुसरीकडे विक्री केली.

तसेच बोगस ग्राहकांच्या नावे खाते बुक तयार केले. त्यावर त्यांचे खोटे शिक्के मारून रिसीट पंपावरील कर्मचारी गणेश बनसोडे आणि नवनाथ साठे यांना देऊन त्यांच्याकडून पंपावरील रोख रक्कम स्वीकारली. फिर्यादीची एकूण ६६ लाख ५७ हजार ३९८ रुपयांची फसवणूक करून आरोपींनी त्या पैशांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलीस उपनिरीक्षक अजित काकडे तपास करीत आहेत.

Web Title: hinjewadi petrol pump owner cheated of 66 lakh crimes against both managers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.