महिलेसह तिच्या प्रियकरास मारहाण
By admin | Published: July 7, 2017 03:35 AM2017-07-07T03:35:47+5:302017-07-07T03:35:47+5:30
दुसरे लग्न करून आलेल्या विवाहितेला तिच्या प्रियकरासह कुटुंबीयांनी मारहाण केली. त्यात तिच्या डोळ्याला इजा झाली तर प्रियकराला
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : दुसरे लग्न करून आलेल्या विवाहितेला तिच्या प्रियकरासह कुटुंबीयांनी मारहाण केली. त्यात तिच्या डोळ्याला इजा झाली तर प्रियकराला पहिल्या पतिराजांनी व कुटुंबीयांनी लाथा बुक्यांनी बेदम चोप दिला. तसेच शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना निगडी येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिया श्याम ढावारे (वय १८, रा. बार्शी, सोलापूर) या महिलेचे श्याम सखाहारी ढावारे (वय २४, सोलापूर) याच्याशी आगोदर लग्न झालेले असताना, तिने पळून जाऊन महादेव देशमुख याच्याशी पळून जाऊन दुसरे लग्न केले. ती बार्शी, सोलापूर येथून निगडी ओटास्किम येथे आत्याकडे आली. ही माहिती मिळताच मागावर आलेल्या तिच्या आईवडील, मामा व पती श्याम यांचे तेथे भांडण झाले. वडिलांनी तीक्ष्ण हत्याराने मारल्याने डाव्या डोळ्याच्या पापणीस इजा झाली. तसेच डाव्या हातावर जखम झाली. तिचे मामा अजित शेंडगे आणि वडील रमेश किसन लोखंडे (वय ३८) यांनी तिच्यासमोरच महादेव देशमुख यास बेदम मारहाण केली. त्याला जिवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद प्रिया ढावारे हिने निगडी पोलिसांकडे दिली आहे. रमेश लोखंडे, अजित शेंडगे, श्याम ढावारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.