‘पवनामाई’ अभियानातील नारीशक्तीचा सन्मान, विश्वसुंदरी युक्ता मुखीच्या हस्ते नदीची आरती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 01:45 AM2019-03-20T01:45:51+5:302019-03-20T01:46:11+5:30
रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडी व कनेक्टिंग एनजीओ यांच्या संयुक्त विद्यमाने जलपर्णीमुक्त व सांडपाणी विरहित पवनामाई अभियानात सक्रिय सहभाग आणि पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या नारीशक्तीचा सन्मान करण्यात आला.
रावेत - रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडी व कनेक्टिंग एनजीओ यांच्या संयुक्त विद्यमाने जलपर्णीमुक्त व सांडपाणी विरहित पवनामाई अभियानात सक्रिय सहभाग आणि पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या नारीशक्तीचा सन्मान करण्यात आला. विश्वसुंदरी युक्ता मुखी, पर्यावरणतज्ज्ञ केतकी घाटे व मानसी करंदीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पवनामाईची आरती करण्यात आली. तसेच निसर्ग संवर्धनासाठी काम करणाऱ्या ४२ महिलांचा या वेळी सत्कार करण्यात आला.
रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडी आयोजित जलपर्णीमुक्त स्वच्छ व सुंदर सांडपाणी विरहित पवनामाई, पवनेचा उगम ते संगम अशा अभियानांतर्गत शहरातील दिशा फाउंडेशन, पवनाजलमैत्री अभियान व निसर्गराजा मैत्र जिवांचे आणि ग्रीनशोरा या संस्थांनी एकत्रित येऊन महिलांचा सत्कार समारंभ घेतला. ४२ नारीशक्तीचा सन्मान करण्यात आला. या वेळी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरे, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, अर्चना बारणे, माया बारणे आदी उपस्थित होते.
तेजस लिमये, पुष्पा धर्माधिकारी, मानसी मस्के, माधुरी मापारी, जयश्री मनकर, आरती मसुडगे, मोनाली धुमाळ, वैशाली खराडे, जयश्री संदीप सकपाळ, मनीषा हिंगणे, किशोरी अग्निहोत्री, प्राजक्ता रुद्रवार, संगीता घोडके, प्रा़ भारती महाजन, सुनीता गायकवाड, बिलवा देव, विदुला पेंडसे, संगीता शालीग्राम, अनुजा गडगे, नंदिनी सूर्यवंशी, मृणाल लिमये, शैलजा देशपांडे, आभा भागवत, उष्प्रभा पागे, अपूर्वा संचेती, साधना साखरे, किशोरी हरणे, रेश्मा बोरा, सोनाली काळे कदम, वैष्णवी पाटील, पल्लवी चवरडोल, उमा क्षीरसागर, खंडागळे, गोकर्णा तोडकर, सुमित्रा वाल्हेकर, विजयालक्ष्मी भावसार, डॉ़ शैलजा भावसार, स्नेहा फुलकर यांचा सत्कार करण्यात आला. गंगा आशियाना सोसायटी, थेरगाव महिला, एम बाऊन्सर महिला, भोंडवे एम्पायर सोसायटी रावेत महिला, वूड्स विले सोसायटी मोशी महिला प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला नदी घाटांवर आरती होणार आहे़ मोरया गोसावी घाटावर चतुर्थीला आरती असणार आहे, अशी माहिती अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर यांनी दिली. प्रणाली हरपुडे यांनी सूत्रसंचालन केले. स्वाती वाल्हेकर यांनी प्रास्ताविक केले़ रेश्मा बोरा यांनी आभार मानले.