उद्योगनगरीत रांगोळ्या, नाटिका, पोवाड्यातून शिवरायांना मानवंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 01:51 AM2019-02-21T01:51:32+5:302019-02-21T01:51:55+5:30
शहरात शिवजयंतीचा उत्साह : छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या प्रतिमा, पुतळ्याचे पूजन
पिंपरी : शिवजयंतीनिमित्त उद्योगनरीत विविध उपक्रम राबविण्यात आले. शाळा, महाविद्यालयांत छत्रपती शिवाजीमहाराजांच्या प्रतिमेचे आणि पुतळ्याचे पूजन करण्यात आले. पोवाडे आणि नाटिका सादर करून विद्यार्थ्यांकडून मानवंदना देण्यात आली. रांगोळ्या काढून आणि भगव्या पताका तसेच झेंडे लावून परिसरात सजावट करण्यात आली होती. मराठा युवा संघातर्फे शिवपूजन
दिघी : परिसरातील दिघीकर विकास प्रतिष्ठान व छावा मराठा युवा महासंघ यांच्या वतीने छत्रपती शिवाजीमहाराजांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती संभाजीमहाराज चौकात हॅप्पी इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी विविध वेशभूषा साकारून सहभागी झाले होते. भगवा ध्वज उंच धरित जय जिजाऊ जय शिवरायच्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता. कृष्णा वाळके यांच्या हस्ते शिवपूजन करण्यात आले. के. के. जगताप, दिघीकर विकास प्रतिष्ठानचे रवी चव्हाण, संतोष जाधव, उत्तम घुगे, सुनील काकडे, छावा मराठा युवा महासंघाचे बालाजी गादेकर आणि कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
महिलांकडून शिवजन्मोत्सव
दिघी : पद्मावती महिला बचत गटाकडून इंद्रायणीनगरमध्ये शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी सकाळी पाळणा सोहळा करून शिवगीते सादर करण्यात आली. या वेळी मुलांसाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र उपाध्यक्ष अभिमन्यू पवार यांच्या व्याख्यानाचे आयोजित केले होते.
पद्मा पाटील, अनुराधा पवार, लता गोयल, सीमा धुमाळ, सुवर्णा दळवी, कीर्ती भिलारे, योगिता मुसांडे, स्नेहल ढेरे, पूनम पाटील, अर्चना पºहाड यांनी विशेष प्रयत्न केले.
युवक कॉँग्रेसतर्फे रॅली
पिंपरी : शिवजयंतीनिमित्त युवक काँग्रेसतर्फे शिवस्फुर्ती दुचाकी रॅली काढण्यात आली. नरेंद्र बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन केले होते. पिंपरी चौकातून निघालेल्या रॅली ने प्रथम एच. ए कंपनी जवळील शिवस्मारकास अभिवादन केले, पुष्पहार अर्पण करून सुरूवात केली. नतंर पिंपरी गावातील शिवछत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. लांडेवाडी चौकात रायगडाच्या दरवाज्याच्या प्रतिकृती समोरील शिवरायांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करण्यात आला. दापोडीत शिवस्मारकास पुष्पहार अर्पण करून रॅलीची सांगता करण्यात आली. या रॅलीमध्ये १०० दुचाकीस्वार सहभागी झाले होते. विजय ओव्हाळ, हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष नासीर चौधरी, जिल्हा युवक सरचिटणीस विरेंद्र गायकवाड, करण गील, अनिकेत अरकडे, गौरव चौधरी, रोहीत तिकोणे, फारूक खान, अनिल सोनकांबळे,बाळासाहेब डावरगावे, सैज्जाद चौधरी, सौनू शेख, अदित्य खराडे, सोहेल शेख, राहूल पवार, शुभम शिंदे, पांडूरंग वीर आदी यावेळी उपस्थित होते.
एचए कॉलनीत व्याख्यान
१पिंपरी : येथील एचए कॉलनी येथे शिवस्मारक प्रतिष्ठानातर्फे शिवजयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कामगारनेते अरुण बोºहाडे अध्यक्षस्थानी होते. महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. इतिहास संशोधक आणि व्याख्याते डॉ. प्रमोद बोराडे यांचे या वेळी व्याख्यान झाले. आमदार गौतम चाबुकस्वार, नगरसेविका सुलक्षणा धर, महम्मद पानसरे, विजय कापसे, अमिना पानसरे, चंद्रकांत पुरम, सुनीता शिवतारे, विजय पाटील, शंकर बारणे, राजेंद्र जाधव, दिलीप कदम, कैलास नरुटे, प्रवीण रुपनर, अरुण पवार आदी या वेळी उपस्थित होते. एचए माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी पोवाडा सादर केला. श्री शिवस्मारक प्रतिष्ठानाचे कार्याध्यक्ष कुमार बोरगे, सरचिटणीस बाळासाहेब साळुंके, उपाध्यक्ष सुरेंद्र पासलकर, मोरेश्वर थिटे, संतोष ढोरे, सर्जेराव जुनवणे, प्रकाश थोरात, रमेश खराडे, नंदकुमार अडसूळ, राजेंद्र कलापुरे, घनश्याम निम्हण, श्यामकांत काळे, सुनील बडदाल यांनी संयोजन केले. नितीन नलावडे यांनी सूत्रसंचालन केले. सर्जेराव जुनवणे यांनी आभार मानले.
शिशुविहार प्राथमिक विद्यालय
२रावेत : आकुर्डी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शिशुविहार प्राथमिक विद्यालयातर्फे शिवजयंतीनिमित्त आकुर्डी परिसरात रॅली काढण्यात आली. विद्यालयातील बालचमू शिवबा, मावळे व जिजाऊंच्या वेशभूषेत या रॅलीत सहभागी झाले होते. ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. शिवव्याख्याते प्रदीप कदम, मोहन गायकवाड, मुख्याध्यापका रमेश कुसाळकर, अंजली फर्नांडिस, शैला गायकवाड आदी उपस्थित होते. कदम म्हणाले, ‘‘छत्रपती शिवरायांच्या अंगी असलेले शौर्य, जिद्द, चिकाटी हे गुण विद्यार्थ्यांनी अंगीकारल्यास व्यक्तिमत्त्व विकासाबरोबर देशाचे सक्षम नागरिक निर्माण होण्यास मदत होईल.’’ पुलवामातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नंदकिशोर ढोले व दीपाली मोहिते यांनी आयोजन केले. विकास गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. कविता रोडे, वर्षा नलवडे, सुलभा दरेकर, सुरेखा नलावडे, माधवी भोसले, गौरी वाडकर, मंजूषा बावधनकर, बालिका कुलकर्णी, सचिन ढेरंगे यांनी संयोजन केले.