रुग्णालय समस्यांच्या गर्तेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 01:14 AM2018-08-09T01:14:51+5:302018-08-09T01:14:53+5:30
महापालिकेच्या थेरगाव येथील कांतिलाल खिंवसरा-नरसिंग पाटील रुग्णालय व प्रसूतिगृहाची जागेअभावी कोंडी झाली आहे.
पिंपरी : महापालिकेच्या थेरगाव येथील कांतिलाल खिंवसरा-नरसिंग पाटील रुग्णालय व प्रसूतिगृहाची जागेअभावी कोंडी झाली आहे. तोकडी जागा, तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. काळेवाडी, थेरगाव, थेरगाव गावठाण व वाकड येथील रुग्ण उपचारासाठी येथे येत असतात. त्यामुळे रुग्णालयामध्ये मोठी गर्दी असते. मात्र जागेअभावी त्यांची गैरसोय होते.
रुग्णालय तीनमजली आहे. बाह्यरुग्ण तपासणी विभागासोबतच प्रसूतिगृह उपलब्ध आहे. कुटुंब नियोजनासाठी समुपदेशन, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, गर्भपात अशा सुविधा येथे पुरविल्या जातात. त्याचप्रमाणे डेंगी, मलेरिया यांसारख्या आजारांचे सर्वेक्षण करून लसीकरण केले जाते. डेंगीचा रुग्ण आढळला, तर त्याला वायसीएममध्ये पाठवले जाते. कर्मचारी नागरिकांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन लसीकरण करतात. साथीचे आजार होऊ नयेत यासाठी पाण्याची तपासणी केली जाते. सर्पदंश व श्वानदंशावर उपचार केले जातात. रुग्णालयामध्ये आॅपरेशन थिएटरची सुविधा आहे. भूलतज्ज्ञ असल्याने महिलांना सिझरसाठी दुसरीकडे पाठवावे लागत नाही. रुग्णालयामध्ये या सुविधा आहेत, मात्र जागा कमी असल्याने रुग्णांसोबतच कर्मचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. आॅपरेशन थिएटर व प्रसूती विभाग वरच्या मजल्यावर असल्यामुळे रुग्णांना नेताना अडचण होते. स्वच्छतागृह छोटे असून, त्यामध्ये अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे रुग्णांना आजार होण्याची शक्यता आहे. परिसरात स्वच्छता ठेवण्याची गरज आहे, असे मत परिसरातील नागरिकांतून व्यक्त होत आहे. रुग्णालयाची संरचना अतिशय गुंतागुंतीची आहे. रक्त-लघवी तपासणी, बाह्यरुग्ण तपासणी, स्त्री-रोग तपासणी असे सगळे विभाग शेजारी शेजारी असल्यामुळे एकाच जागी रुग्णांची मोठी गर्दी होते. रुग्णांवर नियंत्रण ठेवताना कर्मचाºयांचीही धावपळ होते. रुग्णालयाचे बांधकाम करताना या गोष्टींचा विचार न केल्याने त्याचा त्रास होत आहे, अशी भावना व्यक्त होत आहे.
मोजक्या सुविधा असल्यामुळे इतर आजारांवरील उपचारासाठी रुग्णांना दुसरा पर्याय शोधावा लागतो. कान, नाक, घसा, डोळे, दंतरोग यावर प्राथमिक उपचार केले जातात. यावर शस्त्रक्रिया होत नसल्याने रुग्णांना वायसीएमचा संदर्भ दिला जातो. प्रसूतिगृह असून, देखील बालरोगतज्ज्ञच नसल्याने ऐनवेळी धावपळ करावी लागते. प्रसूती झाल्यानंतर बाळाला दुसरीकडे नेण्याची वेळ आली, तर आई एका ठिकाणी आणि बाळ दुसºया ठिकाणी अशी परिस्थिती उद्भवते. त्यामुळे नातेवाइकांचीही धावपळ होते. रुग्णालयाची संरचना अतिशय गुंतागुंतीची आहे. रक्त-लघवी तपासणी, बाह्यरुग्ण तपासणी, स्त्री-रोग तपासणी असे सगळे विभाग शेजारी शेजारी असल्यामुळे एकाच जागी रुग्णांची मोठी गर्दी होते. येथे ठेवण्यात आलेले बाकही रुग्णांना अडसर ठरतात. आॅपरेशन थिएटर व प्रसूती विभाग वरच्या मजल्यावर असल्यामुळे रुग्णांना नेताना अडचण होते. स्वच्छतागृह छोटे असून, त्यामध्ये अस्वच्छता पसरली आहे. आता रुग्णालयाच्या पाठीमागे स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे. मात्र ते अद्याप सुरू केले नाही. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होते. रुग्णालयासमोरील पत्र्याच्या शेडवरील पत्रे बदलण्याची आवश्यकता आहे. प्रवेशद्वार व इमारतीच्या दरवाजावर लावलेल्या फलकांची दुरवस्था झाली आहे. त्याचा रंग गेल्यामुळे अक्षरे स्पष्ट दिसत नाहीत. विशेष म्हणजे येथे तीनही महिला डॉक्टर असल्याने पुरुषांची मोठी गैरसोय होते. अनेक रुग्ण यामुळे उपचार न घेताच फिरून जातात. सद्य:स्थितीत अशा एक ना अनेक अडचणींचा सामना रुग्णांना व कर्मचाºयांना करावा लागत आहे. रुग्णालय वाढविण्यासाठी येथे जागा उपलब्ध नाही. त्यामुळे सध्या तरी रुग्णांना हा त्रास सहन करावा लागणार आहे. या परिसरामध्ये मोठ्याप्रमाणात बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे बांधकामावर काम करणाºया मजुरांची संख्या जास्त आहे. त्यांना खासगी रुग्णालयामध्ये परवडत नाही. यासाठी या रुग्णालयामध्ये सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी होत आहे.
आरोग्यविषयक सर्व सरकारी योजना येथे राबविल्या जातात. दर दिवशी सुमारे ३०० ते ३५० रुग्ण तपासणी व औषधोपचारासाठी येथे येत असतात. मागच्या महिन्यामध्ये पाच हजार ८२३ रुग्णांची व ६८२ गरोदर मातांची तपासणी करण्यात आली होती. इतक्या रुग्णांवर उपचार करताना जागेअभावी कर्मचाºयांची दमछाक होते. मात्र सर्व कर्मचारी चांगल्या सुविधा देतात. - सुनीता इंजिनियर, वैद्यकीय अधिकारी
रुग्णालयामध्ये नेहमीच खूप गर्दी असते. सकाळी रांगेत उभे राहिले, तरी एक वाजेपर्यंत नंबर लागत नाही. त्यामुळे खूप गैरसोय होते.’’
- किरण ताम्हाणे, रुग्ण
कर्मचाºयांकडून महिलांना चांगल्या सुविधा दिल्या जातात. मात्र गर्दी असल्यामुळे खूप वेळ ताटकळत उभे राहावे लागते. तसेच स्वच्छतागृहांचीही सफाई वेळेवर केली जात नाही. त्यामुळे महिलांची खूप गैरसोय होते. - राजश्री दिघे, रुग्ण