हॉटेलमधील कामगारांनी ग्राहकांना जेवणाऐवजी दिला चोप

By प्रकाश गायकर | Updated: December 27, 2024 16:41 IST2024-12-27T16:41:44+5:302024-12-27T16:41:55+5:30

पिंपरी : हॉटेलमध्ये ऑर्डर बदलण्याच्या कारणावरून हॉटेलमधील कामगारांनी दोन ग्राहकांना बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. २५) दुपारी ...

Hotel workers served chopsticks to customers instead of food | हॉटेलमधील कामगारांनी ग्राहकांना जेवणाऐवजी दिला चोप

हॉटेलमधील कामगारांनी ग्राहकांना जेवणाऐवजी दिला चोप

पिंपरी :हॉटेलमध्ये ऑर्डर बदलण्याच्या कारणावरून हॉटेलमधील कामगारांनी दोन ग्राहकांना बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. २५) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास बावधनमधील सेंदूर सरवाना भवन हॉटेलमध्ये घडली. याप्रकरणी अर्थव मनोहर दगडे (वय २१, रा. पाटीलनगर, बावधन, पुणे) यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सेंदूर सरवाना भवन हॉटेलमधील दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अर्थव आणि त्यांचा मित्र असे दोघेजण बावधनमधील सेंदूर सरवाना भवन हॉटेलमध्ये नाष्टा करण्यासाठी गेले होते. तिथे ऑर्डर बदलण्याच्या कारणावरून शाब्दिक बाचाबाची झाली. त्यावेळी हॉटेलमधील दोघांनी फिर्यादी व त्यांच्या मित्राला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

त्यानंतर जवळ पडलेल्या फावड्यानेही मारहाण केली. या मारहाणीमध्ये फिर्यादी अर्थव यांच्या डाव्या कानाच्या पाठीमागील बाजूस, कानाला व डाव्या हाताच्या अंगठ्याला मार लागला आहे. तसेच फिर्यादी यांच्या सोबत असलेल्या मित्राला सुद्धा मार लागला आहे.

Web Title: Hotel workers served chopsticks to customers instead of food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.