Pimpri-Chinchwad: पिंपरी-चिंचवडमध्ये मध्यरात्री सुरू असलेली हॉटेल पोलिसांच्या निशाण्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 02:07 PM2023-06-06T14:07:49+5:302023-06-06T14:09:09+5:30

रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवणारे हॉटेलचालक पोलिसांच्या निशाण्यावर...

Hotels operating at midnight in Pimpri-Chinchwad targeted by police | Pimpri-Chinchwad: पिंपरी-चिंचवडमध्ये मध्यरात्री सुरू असलेली हॉटेल पोलिसांच्या निशाण्यावर

Pimpri-Chinchwad: पिंपरी-चिंचवडमध्ये मध्यरात्री सुरू असलेली हॉटेल पोलिसांच्या निशाण्यावर

googlenewsNext

पिंपरी : मध्यरात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवणारे हॉटेलचालक पोलिसांच्या निशाण्यावर आहेत. पिंपरी स्टेशन येथील हॉटेल कुणाल रेस्टॉरंट बार हे हॉटेल रविवारी (दि.४) मध्यरात्री अडीचच्या सुमारास सुरू असल्याचे पेट्रोलिंग दरम्यान पोलिस मार्शल यांना दिसून आले. त्यांनी तत्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिस नाईक सिद्राम बाबा यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सनी परमानंद सुखेजा (वय ३३, रा. पिंपरी ), सरफराज मोहम्मद अली (वय ३५, रा. पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि पोलिस नाईक कुऱ्हाडे हे पिंपरी मार्शल ड्युटीवर असताना पिंपरी रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या कुणाल हॉटेलमध्ये त्यांना पेटत्या शेगडीच्या बाजूला तीन गॅस सिलिंडर आढळून आले. हॉटेलमध्ये मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास दोन ग्राहक जेवण करीत होते. दोघे जण जेवण करण्यासाठी आले होते. हेल्पर वेटर आणि आचारी असे आणखी तिघे जण हॉटेलमध्ये होते.

हॉटेल मालकांनी हॉटेलमधील लोकांची आरोग्याची काळजी न घेता तसेच गॅस हा ज्वालाग्रही पदार्थ असल्याचे माहिती असताना त्याच्या बाजूला पेटती शेगडी ठेवून हयगयीचे वर्तन केले. तसेच हॉटेल नेमून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ उघडे ठेवले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Hotels operating at midnight in Pimpri-Chinchwad targeted by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.