महापालिकेऐवजी अज्ञातांनी पाडली घरे
By admin | Published: May 26, 2016 03:37 AM2016-05-26T03:37:38+5:302016-05-26T03:37:38+5:30
एल्प्रो कंपनीसमोरील विजयनगर झोपडपट्टीतील दोन घरांवर बुधवारी सकाळी कारवाई करण्यात आली. बुलडोझर लावून दोनच घरे पाडल्यामुळे महापालिकेची ही कारवाई असू शकत
पिंपरी : एल्प्रो कंपनीसमोरील विजयनगर झोपडपट्टीतील दोन घरांवर बुधवारी सकाळी कारवाई करण्यात आली. बुलडोझर लावून दोनच घरे पाडल्यामुळे महापालिकेची ही कारवाई असू शकत नाही, अशी शंका झोपडीधारकांच्या मनात निर्माण झाली असून, दोन्ही घरांतील साहित्याचे नुकसान झाले आहे.
सकाळी ११ वाजता जेसीबी घेऊन काही लोक आले. त्यांच्याबरोबर पोलिसांच्या वेषातील दोन पुरुष आणि एक महिला होती. त्यांचे काही म्हणणे ऐकून न घेता, जेसीबीने घराच्या भिंती पाडल्या. विचारण्यास गेलेल्या एका महिलेला संबंधित व्यक्तींनी तेथून पिटाळले. विठ्ठल पवार यांचे घर पाडले. (प्रतिनिधी)
काही बोलण्याच्या आत पवार यांचे घर पाडल्यानंतर दुसऱ्या घराकडे मोर्चा वळवून तेथेही जेसीबी लावण्यात आला. एकापाठोपाठ एक अशी दोन्ही घरे जमीनदोस्त केली. कसलीही नोटीस, पूर्वकल्पना न देता ही कारवाई केली. त्यांनी पोलीस तसेच महापालिका अधिकाऱ्यांकडे चौकशी केली. महापालिका अधिकाऱ्यांनी अशा स्वरूपाची बुधवारी कोठेच कारवाई केली नसल्याचे सांगितले.