पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये अडकले कुशल कामगार मग उद्योग सुरू कसे होणार ?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 09:35 PM2020-04-21T21:35:06+5:302020-04-21T21:37:04+5:30

राज्य शासनाने ग्रामीण भागातील काही अत्यावश्यक सेवा देणारे उद्योग व कारखाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे..

how business start while Skilled workers trapped in Pune, Pimpri Chinchwad | पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये अडकले कुशल कामगार मग उद्योग सुरू कसे होणार ?

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये अडकले कुशल कामगार मग उद्योग सुरू कसे होणार ?

Next
ठळक मुद्देपरवानगीनंतरही औद्योगिकचक्र बंदच :  शासनाच्या अटी-शर्थीची पूर्तता करणे जिकरीचे

हणमंत पाटील- 
पिंपरी चिंचवड : शासनाने उद्योग व व्यवसाय सुरू करण्यासाठी काही अटी- शर्थी घातल्या आहेत. त्यांची पूर्तता करणे उद्योजकाना जिकरीचे ठरत आहे. शिवाय पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये लॉकडाऊन असल्याने कुशल कामगार व व्यवस्थापक यांना चाकण, म्हाळुंगे, शिक्रापूर व रांजणगाव परिसरातील उद्योगापर्यंत पोहचू शकत नाहीत. त्यामुळे शासनाच्या परवानगी नंतरही पुणे औद्योगिक क्षेत्रातील कारखाने सोमवारी सुरू होऊ शकले नाहीत. 
राज्य शासनाने ग्रामीण भागातील काही अत्यावश्यक सेवा देणारे उद्योग व कारखाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. परंतु, उद्योग व व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेक अटी- शर्ती घातल्या आहेत. त्याची पूर्तता करण्याबरोबर एमआयडीसीच्या अधिकाऱ्याकडून ऑनलाइन परवानगी व तशी माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला द्यावी लागणार आहे. संबंधित कंपनीला कामगारांची ने-आण करणे, तेथेच निवास व भोजनाची व्यवस्था करावी लागणार आहे. शिवाय कामगारांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी कंपनीवर राहणार आहे. कामावर असणारा एखादा कामगार पॉझिटिव्ह आढळला, तर मालकावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. या सर्व अटीमुळे कंपनी मालक व उद्योजक काम सुरू करण्यास धजावत नाहीत.
मात्र, पुणे व पिंपरी चिंचवड महानगर हे रेडझोनमध्ये असल्याने येथे लॉकडाउन कडक करण्यात आला आहे. पुणे परिसरातील चाकण, म्हाळुंगे, तळेगाव, शिक्रापूर व रांजणगाव येथील औद्योगिक क्षेत्रात काम  करणारा बहुतेक कुशल कामगार व व्यवस्थापक वर्ग या दोन्ही शहरात अडकला आहे. शिवाय इतर जिल्ह्यातील मोठया प्रमाणात कामगार वर्ग गावी गेला आहे. त्यामुळे थोडया मनुष्यबळावर काम करणे अडचणीचे होत आहे. पुणे व मुंबई लॉकडाउन असल्याने कच्या मालाची वाहतूक करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.  त्यामुळे अत्यावश्यक सेवा म्हणून उद्योग सुरू करण्यास परवानगी मिळाली, तरी आणखी काही दिवस कारखाने सुरु होण्यास लागणार आहेत. 
-----
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शासनाने उद्योग व कंपन्या सुरू करण्यासाठी अनेक कडक अटी व शर्ती घातल्या आहेत. त्यांच्या जागेवर शासनाची भूमिका योग्य आहे. ग्रामीण भागात अनेक उद्योग व कंपनी असल्यातरी त्याचा कुशल कामगार वर्ग, मॅनेजर व मालकही पुणे व पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्यास आहे. दोन्ही महानगरे लॉकडाऊन आहेत. शिवाय उद्योजकांना कामगारांची सर्व व्यवस्था करणे व जोखीम घेणे पेलवणारे नाही. त्यामुळे उद्योग सुरू होण्यास आणखी थोडा वेळ लागेल. 
- संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी चिंचवड लघु उद्योजक संघटना.
---
दिवसभरात कोणत्याही कंपनीचे चालक व मालक परवानगी अथवा माहिती देण्यासाठी पोलीस स्टेशनला आले नाहीत. शासनाने परवानगी दिल्यास कंपन्याना पूर्ण सहकार्य करण्यात येईल. 
- कल्याण पवार, पोलीस निरीक्षक, चाकण पोलीस स्टेशन.

Web Title: how business start while Skilled workers trapped in Pune, Pimpri Chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.