पूजा खेडकरांनी खोटे अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले कसे? जिल्हाधिकारी कार्यालयाचे पिंपरी महापालिकेला चौकशीचे आदेश

By ज्ञानेश्वर भंडारे | Published: July 24, 2024 01:00 PM2024-07-24T13:00:06+5:302024-07-24T13:01:54+5:30

खेडकरांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले असून, त्यात पूजा डाव्या गुडघ्यात कायमस्वरूपी सात टक्के दिव्यांग असल्याचे म्हटले आहे

How did Pooja Khedkar give fake disability certificate Collector office orders inquiry to Pimpri Municipal Corporation | पूजा खेडकरांनी खोटे अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले कसे? जिल्हाधिकारी कार्यालयाचे पिंपरी महापालिकेला चौकशीचे आदेश

पूजा खेडकरांनी खोटे अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले कसे? जिल्हाधिकारी कार्यालयाचे पिंपरी महापालिकेला चौकशीचे आदेश

पिंपरी : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरांवर अटकेची टांगती तलवार असतानाच त्यांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र देणाऱ्यांचे ही आता धाबे दणाणलेत. कारण पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने यशवंतराव चव्हाण (वायसीएम) रुग्णालयाच्या डॉक्टरांसह पूजाला मदत करणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. तसेच खोटे अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवून देणारे रॅकेट असल्यास, ते ही उघडकीस आणावे लागणार आहे. दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने जिल्हाधिकारी कार्यालयाला तशा सूचना दिल्यात. त्याआधारे पिंपरी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला आदेश दिला आहे. वायसीएम रुग्णालयाने पूजा खेडकरांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले असून, त्यात पूजा डाव्या गुडघ्यात कायमस्वरूपी सात टक्के दिव्यांग असल्याचे म्हटले आहे. 

वायसीएमच्या डॉक्टरांसह मदत करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार?

 या प्रमाणपत्राच्या आधारे पूजाने केंद्रीय दिव्यांग विभागाकडून अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळविल्याने या चौकशीला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. कारण दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने वायसीएमच्या खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे त्या शासकीय सेवेत रुजू झाल्यात का? अशी शंका उपस्थित केली आहे. त्याअनुषंगाने याची खात्री पटवण्यासाठी सखोल चौकशी गरजेची आहे. चौकशीत दोषी आढळल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र देणारे डॉक्टर, तसेच मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा. तसेच खोटे अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवून देणारे रॅकेट आहे का? हे उघडकीस आणावे. तसेच या संपूर्ण चौकशीचा अहवाल ही जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करावा. असे या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवून देणाऱ्या डॉक्टरांसह मदत करणाऱ्या प्रत्येकाचे धाबे दणाणले आहेत.

प्रमाणपत्र खोटं नाही : वाबळे

पूजा खेडकर यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे हे प्रमाणपत्र दिले आहे. याची पूर्ण प्रक्रिया पारदर्शी केली आहे. केंद्र शासनाच्या नियमावलीनुसार तपासण्या व प्रक्रिया पार पाडली आहे. त्यात फक्त ७ टक्केच दिव्यांग असल्याचे निष्पन्न झाले व तसे प्रमाणपत्र दिले आहे. अस्थिरोग विभाग व फिजिओथेरपी विभागाच्या विभागप्रमुखाना काय तपासण्या केल्या याचा अहवाल द्या, तशा त्यांनी अहवाल दिला आहे. तो आम्ही महापालिका आयुक्तांकडे देणार आहोत. आयुक्त, जिल्ह्याधिकारी व दिव्यांग आयुक्तलयाला पाठवणार आहोत. -  राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय, पिंपरी

 

Web Title: How did Pooja Khedkar give fake disability certificate Collector office orders inquiry to Pimpri Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.