लक्ष वेधण्यासाठी मानवी साखळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 03:36 AM2017-08-05T03:36:32+5:302017-08-05T03:36:32+5:30
हिंजवडीतील आयटी पार्क परिसरात वाहतूककोंडी डोकेदुखी झाली आहे. साधारण चार ते पाच किलोमीटर अंतरासाठी आयटी अभियंत्यांना सकाळी आणि सायंकाळी चार तास कोंडीत अडकून पडावे लागते.
वाकड : हिंजवडीतील आयटी पार्क परिसरात वाहतूककोंडी डोकेदुखी झाली आहे. साधारण चार ते पाच किलोमीटर अंतरासाठी आयटी अभियंत्यांना सकाळी आणि सायंकाळी चार तास कोंडीत अडकून पडावे लागते. या गंभीर समस्येसाठी लक्ष वेधण्यासाठी आयटी अभियंते आणि हिंजवडी ग्रामस्थांनी शुक्रवारी मानवी साखळी केली.
सायंकाळी पाचच्या सुमारास विप्रो सर्कल फेज दोन येथे मानवी साखळी करण्यात आली. यात अमित तलाठी, हृषिकेश गुजर, सागर बिरारी, नॅन्सी सुसाई, रुचिता शेठ, दीपक काकडे यांच्यासह आयटी कंपन्यांचे स्वयंसेवक, तसेच हिंजवडीचे माजी सरपंच श्याम हुलावळे, सागर साखरे, मल्हारी हरिभाऊ साखरे, मयूर साखरे, आकाश साखरे, संतोष ढवळे, चंद्रकांत जांभूळकर यांच्यासह ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला.