निगडीपर्यंत मेट्रोसाठी मानवी साखळी
By admin | Published: October 24, 2016 12:57 AM2016-10-24T00:57:14+5:302016-10-24T00:57:14+5:30
सार्वजनिक गुंतवणूक मंडळाने (पीआयबी) पुणे मेट्रोला मंजुरी दिली आहे. यामध्ये पिंपरी ते स्वारगेट या मार्गाचा समावेश असून, या मार्गाची मर्यादा निगडीपर्यंत वाढवण्यात यावी
निगडी : सार्वजनिक गुंतवणूक मंडळाने (पीआयबी) पुणे मेट्रोला मंजुरी दिली आहे. यामध्ये पिंपरी ते स्वारगेट या मार्गाचा समावेश असून, या मार्गाची मर्यादा निगडीपर्यंत वाढवण्यात यावी, या मागणीसाठी रविवारी सायंकाळी निगडीतील भक्ती-शक्ती चौकात सामाजिक संस्था आणि संघटना यांनी एकत्रितपणे मानवी साखळी तयार केली होती.
मानवी साखळीत पाच वर्षाच्या मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत अनेकांनी सहभाग घेतला. कनेक्टिंग एनजीओ, पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम , विंग्स आॅफ होप, सावरकर मंडळ, प्राधिकरण नागरी हक्क सुरक्षा समिती, सजग नागरिक मंच पुणे, श्री स्वामी समर्थ मंडळ प्राधिकरण, नोव्हेल ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्स, ज्येष्ठ नागरिक महासंघ, लायन्स क्लब पुणे प्राधिकरण, निसर्ग मित्र मंडळ, आंत्रप्रेन्युअर क्लब निगडी, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ, सांगली जिल्हा मित्रमंडळ, जलदिंडी प्रतिष्ठान, भावसार व्हिजन, नाम फाउंडेशन, यश फाउंडेशन, नमोस्तुते ज्ञानप्रबोधिनी, तुळजाभवानी प्रतिष्ठान, सातारा जिल्हा मित्र मंडळ, औदुंबर प्रतिष्ठान आदी संस्थांचा समावेश होता. (वार्ताहर)