मानवी जीवन हे सुख-दु:खाचे मिश्रण

By admin | Published: March 23, 2017 04:17 AM2017-03-23T04:17:52+5:302017-03-23T04:17:52+5:30

मानवी जीवन सुख-दु:खाचे मिश्रण आहे. परिस्थितीपेक्षा मन:स्थिती महत्त्वाची आहे. मन हे मनुष्याच्या सुख-दु:खाला कारणीभूत असते.

Human life is a mixture of pleasure and pain | मानवी जीवन हे सुख-दु:खाचे मिश्रण

मानवी जीवन हे सुख-दु:खाचे मिश्रण

Next

गहुंजे : मानवी जीवन सुख-दु:खाचे मिश्रण आहे. परिस्थितीपेक्षा मन:स्थिती महत्त्वाची आहे. मन हे मनुष्याच्या सुख-दु:खाला कारणीभूत असते. सर्वांनी शुद्ध परमार्थ करावा. चांगल्या व्यक्तींचा सहवास घडावा, असे प्रतिपादन हभप ज्ञानेश्वरमहाराज शिंदे यांनी गहुंजे येथे केले.
समस्त गहुंजे ग्रामस्थ व संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ यांचे वतीने चौंडाई माता , भगवान शंकर व हनुमंतराय यांच्या मूर्ती प्रतिष्ठापना पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहातील पहिल्या दिवशीच्या कीर्तनात शिंदे महाराज बोलत होते. अखंड हरिनाम सप्ताहाला हभप यतिराजमहाराज लोहर , विलासमहाराज बागल , भोलेशमहाराज ठाकर यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. (वार्ताहर)

Web Title: Human life is a mixture of pleasure and pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.