पुरुषांसारखेच महिलांनाही मानवी हक्क

By admin | Published: February 20, 2017 02:37 AM2017-02-20T02:37:21+5:302017-02-20T02:37:21+5:30

पुरुषांसारखेच महिलांनादेखील मानवी हक्क अधिकार आहेत. त्यांना आदर, प्रेम, आत्मीयता व समानतेची गरज आहे. महिला सबलीकरण

Human rights as women like men | पुरुषांसारखेच महिलांनाही मानवी हक्क

पुरुषांसारखेच महिलांनाही मानवी हक्क

Next

मोरवाडी : पुरुषांसारखेच महिलांनादेखील मानवी हक्क अधिकार आहेत. त्यांना आदर, प्रेम, आत्मीयता व समानतेची गरज आहे. महिला सबलीकरण किंवा सुरक्षा या गोष्टी कायद्यापर्यंतच मर्यादित न राहता महिलांना त्याची सुरुवात घर, शाळा व महाविद्यालयापासून करायला हवी, असे मत मुंबई उच्च न्यायालयचे न्यायाधीश डॉ. शालिनी फणसालकर-जोशी यांनी व्यक्त केले.
एसएनबीपी विधी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित जेन्डर अ‍ॅन्ड लॉ या विषयावरील व्याख्यानात न्यायाधीश डॉ. फनसालकर-जोशी बोलत होत्या. एसएनबीपी महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. या वेळी न्यायाधिश डॉ. फनसालकर-जोशी यांच्या हस्ते विधी सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमात सुभद्रा एज्युकेशनल सोसायटीचे संस्थापक, सचिव डॉ. डी. के. भोसले, अध्यक्ष वृषाली भोसले, संचालक प्राध्यापक सुनील शेवाळे व एसए़नबीपी महाविद्यालयाच्या प्राचार्या रोहिणी जगताप आदी उपस्थित होते. न्यायाधिश डॉ. फनसालकर-जोशी यांनी विद्यार्थ्यांना कौटुंबिक अत्याचारविरोधी कायदा, हुंडाविरोधी कायदा, वारसा हक्क, पोटगी, विधवा, हिंदु दत्तक कायदा आदी महिलांविष़यीच्या कायद्यांची माहिती दिली.
सुधीर सूर्यवंशी व क्रिस्ती यांनी सूत्रसंचालन केले. प्राध्यापक कैलास पोळ यांनी आभार मानले. (वार्ताहर)

Web Title: Human rights as women like men

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.