धावत्या युगात हरवतेय माणुसकी, मदतीपेक्षा चित्रीकरणावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 04:15 AM2017-12-24T04:15:53+5:302017-12-24T04:16:09+5:30

वेळ दुपारी साडेतीनची. आंबेडकर चौकात गर्दी जमलेली... वाहतूक पोलीस वाहनांना हात करून वाहन थांबवत होता. बाजूला एक व्यक्ती निपचित पडलेली.. बोटावर मोजण्याइतक्या व्यक्ती त्या व्यक्तीजवळ थांबलेल्या.

Humanity in the early era, focusing on shooting rather than help | धावत्या युगात हरवतेय माणुसकी, मदतीपेक्षा चित्रीकरणावर भर

धावत्या युगात हरवतेय माणुसकी, मदतीपेक्षा चित्रीकरणावर भर

googlenewsNext

पिंपरी : वेळ दुपारी साडेतीनची. आंबेडकर चौकात गर्दी जमलेली... वाहतूक पोलीस वाहनांना हात करून वाहन थांबवत होता. बाजूला एक व्यक्ती निपचित पडलेली.. बोटावर मोजण्याइतक्या व्यक्ती त्या व्यक्तीजवळ थांबलेल्या. बाकी सर्वच जण आपल्याला काहीच देणे-घेणे नाही याप्रमाणे बाजू देऊन चालले. ही एखाद्या चित्रपटाला साजेसे चित्र वाटेल, पण ही सत्यघटना आहे. धावत्या युगात माणसुकी हरवत चालल्याचा प्रत्ययच या घटनेमुळे येत होता.
येथील आंबेडकर चौकामध्ये एक व्यक्ती दुचाकीवरून खाली पडली. त्याच्या डोक्याला आणि डोळ्याला प्रचंड मार लागलेला होता. त्याच्या शरीरातून रक्त वाहत होते. पलीकडच्या बाजूला रुग्णवाहिका होती. ती अपघातग्रस्ताच्या जवळ आणण्याचा आटापिटा वाहतूक पोलीस करीत होता. पण त्यातही अनेक जण वाहन दामटत होते. अखेर काही कार्यकर्त्यांच्या मदतीने रुग्णवाहिकेला रस्ता रिकामा केला. पण रुग्णवाहिकाचालकाने गाडीत आधीच पेशंट आहे, असे सांगून रस्त्यावर पडलेल्या व्यक्तीला घेण्यास नकार दिला. वाहतूक पोलीस आणि काही कार्यकर्त्यांनी जखमींना रिक्षात बसविण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी अनेक जण मदत करण्याऐवजी मोबाइलमध्ये छबी टिपण्यात मग्न होते. काही वेळात वाहतूक विभागाचे अधिकारी दाखल झाले. वॉर्डनच्या मदतीने गाडीवरून खाली पडलेल्या व्यक्तीला रुग्णालयात पाठविले.
शहर परिसरात अशा घटना घडल्या, की त्या घटनेचे शूटिंग करणे, त्याची व्हिडीओ क्लिप काढणे, ती सोशल मीडियावर टाकणे असा ट्रेंड निर्माण होत आहे. घटना घडली, की मदत करण्याची माणसुकी हरपत चालल्याचे चित्र दिसत आहे.

नियमांचे उल्लंघन
पिंपरीतील आंबेडकर चौकाकडून मुंबईकडे जाण्याच्या रस्त्यावर येताना वाहनचालक सर्कलला वळसा घालून येत नाहीत. सर्रासपणे शॉर्टकटचा वापर करतात. आधीच बीआरटीमुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी किरकोळ अपघात होत आहेत. नियम मोडणाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Humanity in the early era, focusing on shooting rather than help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.