पोलीस चौकीत गोंधळ घालणारा नगरसेविकेचा पती गजाआड
By admin | Published: June 26, 2017 03:53 PM2017-06-26T15:53:23+5:302017-06-26T15:53:23+5:30
पोलीस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की, शिवीगाळ करणाऱ्या भाजपा नगरसेविकेच्या पतीNE सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी निगडी पोलिसांनी अटक केली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 26- पोलीस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की, शिवीगाळ करणाऱ्या भाजपा नगरसेविकेच्या पतीNE सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी निगडी पोलिसांनी अटक केली आहे. अनिल उर्फ बापू अभिमान घोलप असं आरोपीचं नाव आहे. भाजपाच्या प्रभाग क्रमांक १३ च्या नगरसेविका कमल घोलप यांचे ते पती आहेत.
पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार निगडी ओटास्किम येथील रहिवासी अनिल घोलप (वय ४०) हा आरोपी राजू नामदेव रिठे (वय २२) या कार्यकर्त्याला बरोबर घेऊन रविवारी रात्री बारा वाजता यमुनानगर पोलीस चौकीत आला. माझ्या वॉर्डातील लोकांची फिर्याद का दाखल करून घेत नाही. असे म्हणुन तेथील पोलीस कर्मचाऱ्याशी वाद घातला. मात्र, मूळ तक्रारदार कोण आहे, त्यांना घेऊन या, त्यांचे म्हणणे ऐकुण घेऊन तक्रार नोंदवता येईल, असे पोलीस कर्मचाऱ्यांनी समजून सांगितले. परंतू पोलीसांचे ऐकुन न घेता, पोलीस हवालदार आठवले यांना शिवीगाळ केली. आठवले यांच्याशी आरे तुरेची भाषा करीत, आठवले,‘‘मी नगरसेवक आहे, हे तुला माहित नाही का ?’’ असे शब्द वापरून शिवीगाळ, धक्काबुक्की केली. मदतीसाठी आलेल्या पोलीस उपनिरिक्षक सुर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरिक्षक साबळे यांनाही शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर पोलीस निरिक्षक शंकर आवताडे यांनाही धमकी दिली. ड्युटीवरील पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण, शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आरोपी घोलप याच्याविरोधात निगडी पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार नागेंद्र निगाप्पा बनसोडे यांनी फिर्याद दाखल केली आहे. सोबत नसल्याने पोलिसांनी पहिले तक्रारदाराला आणा मग तक्रार घेतो असे सांगितले. यावेळी घोलप याने गोंधळ सुरू केला. तसेच पोलीस कर्मचा-याला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली.
दरम्यान, पोलिसांनी घोलप याला अटक केली असून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत.