घटस्फोटापूर्वीच दुसरे लग्न केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 04:55 PM2021-01-28T16:55:21+5:302021-01-28T16:56:34+5:30
विवाहितेला मारहाण करून मानसिक व शारीरिक त्रास देऊन क्रूर वागणूक दिली.
पिंपरी : माहेरहून पैसे आणण्याची मागणी करून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. तसेच तिच्याशी घटस्फोट घेण्यापूर्वीच दुसरे लग्न केले. याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार सन २०१० पासून २९ ऑक्टोबर २०२० या कालावधीत सातारा आणि मोशी येथे घडला.
नितीन मोहन सोनवणे (वय ३९, रा. मोशी), जयश्री मोहन सोनवणे (वय ६५), मोहन गणपत सोनवणे (वय ७०, दोघे रा. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित ३६ वर्षीय महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपींनी विवाहितेकडे माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. त्यासाठी विवाहितेने नकार दिला. त्यावरून विवाहितेला मारहाण करून मानसिक व शारीरिक त्रास देऊन क्रूर वागणूक दिली. फिर्यादी विवाहिता आणि आरोपी पती नितीन यांचा कायदेशीर घटस्फोट झालेला नाही. असे असताना नितीन याने दुसरा विवाह केला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.