हायफाय जमान्यातही अंधश्रद्धा कायम
By admin | Published: February 23, 2017 02:45 AM2017-02-23T02:45:28+5:302017-02-23T02:45:28+5:30
उमेदवारांनी प्रचारासाठी सोशल मिडियाचा वापर केला. तसेच व्हॉट्स अपसारख्या माध्यमातून
निगडी : उमेदवारांनी प्रचारासाठी सोशल मिडियाचा वापर केला. तसेच व्हॉट्स अपसारख्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. तरीही विजयश्रीबाबत खात्री नसलेल्या अनेक उमेदवारांनी अंधश्रद्धेतून लाखो रुपयांचा चुराडा केल्याची चर्चा आहे.
निगडीतील एका उमेदवाराने मतदानासाठी बाहेर पडताना नारळ आणि लिंबूचा गाडीच्या चाकाखाली चुराडा केला. प्रतिस्पर्धी उमेदवारांचे बळ कमी व्हावे, अशी त्यामागची भावना असल्याचे चर्चा आहे.
तर काही उमेदवारांनी ज्योतिषी सांगतील त्या दिशेनेच प्रचाराला सुरुवात केली. तसेच त्यांच्या सांगण्यानुसार पदयात्रा काढल्याची चर्चा आहे. काही उमेदवारांनी तर हातामध्ये विशिष्ट धातूच्या अंगठ्या घातल्या होत्या. प्रचार करूनही विजयाची खात्री नसल्याने अनेकांनी अंधश्रद्धा म्हणून खर्च केला. निकालात यश आले तर मतदानाचा कौल की अंधश्रद्धेला उमेदवार प्राधान्य ेदेणार, अपयश आल्यानंतर नेमका कोणाला दोष देणार, याबाबतही परिसरात चर्चा सुरु आहे.(वार्ताहर)