Pune Crime| तुला संपवतो म्हणत दोन जणांकडून एकावर चाकूने हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 21:05 IST2022-08-16T21:02:59+5:302022-08-16T21:05:01+5:30
पिंपरी : तुला संपवतो, अशी धमकी देत एका व्यक्तीवर दोन जणांनी चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात गोविंद संभाजी तांबवडे ...

Pune Crime| तुला संपवतो म्हणत दोन जणांकडून एकावर चाकूने हल्ला
पिंपरी : तुला संपवतो, अशी धमकी देत एका व्यक्तीवर दोन जणांनी चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात गोविंद संभाजी तांबवडे हे जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (दि. १५) दुपारी दोन वाजता भोसरी येथे घडली. याप्रकरणी मोहन गोविंद तांबवडे (वय २४, रा. भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अक्षय विलास नागरे (वय १८) अभिषेक मारुती शिंदे (वय १८, दोघेही रा. मानगाव, मुळशी) यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे वडील आणि आरोपी यांच्यामध्ये भोसरीतील बैलगाडा शर्यत आखाडा येथे वाद झाला. या वादातून आरोपींनी फिर्यादीच्या वडिलांना तुला संपवतो, असे म्हणत त्यांच्या छातीत चाकू खुपसला. या हल्ल्यात फिर्यादीचे वडील गंभीर जखमी झाले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.