महिलांसाठी धावणे हा आदर्श व्यायामप्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 01:01 AM2019-02-09T01:01:20+5:302019-02-09T01:01:39+5:30
आपले शरीर निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी व्यायामाची गरज असते. बिझी शेड्यूलमधून धावण्यासाठी रोज अगदी ३० मिनिटे काढली तरी आपण निरोगी जीवनशैलीचा आणि पयार्याने तंदुरुस्तीचा पाया रचू शकतो.
आपले शरीर निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी व्यायामाची गरज असते. बिझी शेड्यूलमधून धावण्यासाठी रोज अगदी ३० मिनिटे काढली तरी आपण निरोगी जीवनशैलीचा आणि पयार्याने तंदुरुस्तीचा पाया रचू शकतो. धावण्यामुळे महिलांची प्रजननक्षमता वाढते. गर्भधारणेसाठी व्यायाम आणि धावणे हे खूप महत्त्वाचे आहे. सध्या महिलांत अनियमित पाळीचे प्रमाण वाढले आहे. या महिलांनी नियमित व्यायाम केला आणि त्यात धावण्याचा समावेश ठेवला, तर त्यांना अशा प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागणार नाही. मनुष्याने आपले शरीर नेहमी निरोगी ठेवले, तर त्याच्यात कुठल्याही संकटाला सामोरे जाण्याची शक्ती निर्माण होते. धावणे हा सर्वांगसुंदर असा व्यायामप्रकार आहे. त्यामुळे तुम्हाला सोसायटीतील स्वीमिंग पूल, जिममध्ये जाता आले नाही किंवा खेळ खेळायला जमले नाही, तरी धावण्यासाठी थोडा वेळ काढा. ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या निमित्ताने आपल्याला आप्तांसह धावण्याची संधी मिळाली आहे. चला, त्याचा आनंद लुटू या.
- डॉ. ममता दिघे, संस्थापक-संचालक, झेनिथ अॅडव्हान्स फर्टिलिटी सेंटर