पिंपरी शहरातील २७ हजार मतदारांना ओळखपत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 03:00 AM2019-03-18T03:00:15+5:302019-03-18T03:00:41+5:30

लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात नोंदणी केलेल्या मतदारांना ओळखपत्रांचे वाटप सुरू आहे. प्रारूप मतदारयादी ३१ जानेवारीला प्रसिद्ध झाली. या यादीतील मतदारांना ओळखपत्र मिळणार आहे.

Identity card for 27 thousand voters in Pimpri city | पिंपरी शहरातील २७ हजार मतदारांना ओळखपत्र

पिंपरी शहरातील २७ हजार मतदारांना ओळखपत्र

Next

पिंपरी - लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात नोंदणी केलेल्या मतदारांना ओळखपत्रांचे वाटप सुरू आहे. प्रारूप मतदारयादी ३१ जानेवारीला प्रसिद्ध झाली. या यादीतील मतदारांना ओळखपत्र मिळणार आहे.
मतदारांची संख्या वाढत असून यात नवमतदारांइतकेच स्थलांतरित झालेल्या मतदारांचीही संख्या लक्षणीय आहे. मतदार नोंदणीचे काम निरंतर सुरू आहे. यात ३१ आॅक्टोबर २०१८ पर्यंत पहिल्या टप्प्यात नावनोंदणी केली. ३१ जानेवारीला प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाली. मतदारांना ओळखपत्र देण्यात येत आहे. बूथस्तरीय अधिकाऱ्यांमार्फेत (बीएलओ) ओळखपत्रांचे वाटप होईल. सर्वाधिक ओळखपत्र चिंचवड विधानसभा मतदारसंघात वाटण्यात येत आहेत.

बीएलओकडून मतदारांनी ओळखपत्र घेऊन जावे. या ओळखपत्रासह ११ ओळखीचे पुरावे सादर करून मतदान करता येणार आहे.
- रेश्मा माळी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, भोसरी विभाग

आॅनलाइनला प्रतिसाद
प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाली असून नावनोंदणी केली. निवडणूक आयोगाने आॅनलाइनची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. फेब्रुवारी आणि मार्चमध्येही मोठ्या संख्येने नोंदणी केली.

Web Title: Identity card for 27 thousand voters in Pimpri city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.