Traffic Police | मिसरूड फुटण्याआधीच वाहन चालवाल, तर पाच हजारांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 12:40 PM2022-12-10T12:40:39+5:302022-12-10T14:02:57+5:30

नव्या परिपत्रकानुसार बाल वाहन चालक सापडल्यास पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे...

If drive the vehicle before 18 year completed a fine of five thousand pune news | Traffic Police | मिसरूड फुटण्याआधीच वाहन चालवाल, तर पाच हजारांचा दंड

Traffic Police | मिसरूड फुटण्याआधीच वाहन चालवाल, तर पाच हजारांचा दंड

googlenewsNext

पिंपरी : अल्पवयीन मुलाने गाडी चालवली, तर त्याला १०० दंडाची तरतूद होती. त्यानंतर, या दंडात पाचपट वाढ करून ५०० रुपये करण्यात आली. वाहतूक पोलिसांनी पकडल्यास १०० रुपये दंड भरून वाहन चालक व पालक निश्चिंत व्हायचे. आता तसे होणार नाही. नव्या परिपत्रकानुसार बाल वाहन चालक सापडल्यास पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

मोटर वाहन सुधारणा अधिनियम २०१९ अंतर्गत गृह परिवहन विभाग मुंबईच्या वतीने वाहन चालकांवरील नवीन दंडाची निर्धारणा करण्यात आली. परिपत्रकातून १६ वर्षांखालील मुलगा किंवा मुलगी वाहन चालविताना वाहतूक पोलिसाला आढळल्यास, पाच हजार रुपये दंडाची आकारणी करण्यात येणार आहे.

दोन कोटींचा दंड वसूल

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांकडून पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेच्या वतीने जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ई-चलनाद्वारे तब्बल दोन २६ लाख ५६ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मात्र, या दंडात अल्पवयीन वाहन चालकांवर केलेली कारवाई कमी होती.

महाविद्यालयांजवळ संख्या जास्त

महाविद्यालयात जवळ अल्पवयीन वाहन चालक मुला-मुलींचा संख्या जास्त असल्याचे दिसून येते. अनेक जण आपल्या वडिलांची दुचाकी घेऊन येतात. क्लाससाठी जाण्यासाठीही ते वाहनाचा वापर करतात. वाहतूक पोलिसांना कळू नये, म्हणून अनेक जण हेल्मेटचा वापर करतात, तर महाविद्यालयाच्या आवारात हे अल्पवयीन विद्यार्थी ट्रीपल सीट जातानाही दिसून येतात.

पालकांना होईल तुरुंगवास

आपल्या अल्पवयीन मुलांना गाडी देणाऱ्या पालकांवरही वाहतूक पोलिस दंडात्मक कारवाई करू शकतात, शिवाय मुलाकडून अपघात झाल्यास, तसेच नियमांचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाईसोबत पालकांना तुरुंगाची हवा खावी लागू शकते. वाहन कायद्यात तशी तरतूद आहे. त्यामुळे पालकांनीही आपल्या अल्पवयीन मुलाला वाहन देऊ नये, असे आवाहन सामाजिक संस्थांकडून करण्यात येत आहे.

कारवाईचे प्रमाण अत्यल्प

नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांविरोधात वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. या कारवाईमध्ये हेल्मेट नसणाऱ्यांवर होणाऱ्या कारवाईचे प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र, अल्पवयीन वाहन चालकांविरोधात केलेल्या कारवाईचे प्रमाण सर्वात कमी आहे.

Web Title: If drive the vehicle before 18 year completed a fine of five thousand pune news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.