महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्यास विकासाला नवी दिशा मिळेल; राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 04:13 PM2024-11-17T16:13:12+5:302024-11-17T16:13:50+5:30

राजस्थानमध्ये भाजप सरकारने जाहीरनाम्यातील पन्नास टक्के आश्वासने अकरा महिन्यात पूर्ण केली

If the grand coalition government comes to Maharashtra development will get a new direction Trust of Chief Minister bhajan lal sharma of Rajasthan | महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्यास विकासाला नवी दिशा मिळेल; राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचा विश्वास

महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्यास विकासाला नवी दिशा मिळेल; राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचा विश्वास

पिंपरी : भाजप सरकारने राजस्थानमध्ये जाहीरनाम्यातील पन्नास टक्के आश्वासने अकरा महिन्यांत पूर्ण केली आहेत. महाराष्ट्रातही भाजप महायुतीचे सरकार आल्यास विकासाला नवी दिशा मिळेल आणि विकासाचा वेग वाढले, असा विश्वास राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी व्यक्त केला. पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी भाजपचे शिलेदार विधिमंडळात जाणे आवश्यक आहे. त्यासाठी भोसरीतूनमहेश लांडगे यांची विजयाची हॅटट्रिक पूर्ण करा, असे आवाहनही त्यांनी राजस्थानी बांधवांना केले. शर्मा यांनी महायुतीचे भोसरीतील उमेदवार लांडगे यांच्यासोबत नागरिकांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री शर्मा म्हणाले की, गरीब कल्याणकारी योजना, सीमा सुरक्षा, दहशतवादाशी सामना आणि भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या कामाचे सगळीकडे कौतुक होत आहे. राजस्थानमध्ये भाजप सरकारने जाहीरनाम्यातील पन्नास टक्के आश्वासने अकरा महिन्यात पूर्ण केली आहेत. महाराष्ट्रातही महायुतीचे ट्रिपल इंजिन सरकार आल्यास विकासाला नवी दिशा मिळेल.

राजस्थानी बांधव आमदार लांडगे यांच्या पाठीशी

मुख्यमंत्री शर्मा म्हणाले की, राजस्थानी समाजाची भूमिका आणि त्यांच्या राष्ट्रप्रेमाविषयी अभिमान आहे. प्रत्येक राजस्थानी बांधवास राष्ट्रवाद सर्वोच्च आहे. महाराष्ट्र आणि राजस्थान दोन्ही स्वाभिमानाच्या भूमी आहेत. जिथे महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज यांसारखे महान योद्धे जन्माला आले. राजस्थानी समाज नेहमीच भाजपच्या पाठीशी राहिला आहे. त्यामुळे महेश लांडगे यांना राजस्थानी बांधव विजयी करतील.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये राजस्थानी बांधवांची संख्या मोठी आहे. शहराच्या प्रगतीमध्ये सर्व समाजघटकांचे योगदान आहे. राजस्थानी बांधवांचा समाजहित म्हणून पुढाकार असतो. कोरोना काळामध्ये या बांधवांच्या मदतीने आम्ही शहरातील प्रत्येकाला दिलासा देण्यासाठी पुढाकार घेतला. या समाजाच्या सहकार्याने विजयाची हॅटट्रिक होणार आहे. - महेश लांडगे, उमेदवार महायुती, भोसरी.

Web Title: If the grand coalition government comes to Maharashtra development will get a new direction Trust of Chief Minister bhajan lal sharma of Rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.