महिला सक्षम झाल्यास देशाची प्रगती
By admin | Published: March 17, 2017 02:09 AM2017-03-17T02:09:42+5:302017-03-17T02:09:42+5:30
महिला सर्व क्षेत्रांत सक्षम झाल्या, तरच देश सक्षम होईल. त्यासाठी सर्व महिलांनी सर्व क्षेत्रात सक्षम होणे गरजेचे आहे. महिला सबलीकरणासाठी महापालिकेच्या
पिंपरी : महिला सर्व क्षेत्रांत सक्षम झाल्या, तरच देश सक्षम होईल. त्यासाठी सर्व महिलांनी सर्व क्षेत्रात सक्षम होणे गरजेचे आहे. महिला सबलीकरणासाठी महापालिकेच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन महापौर नितीन काळजे यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त संत तुकारामनगर, पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
कार्यक्रमास आयुक्त दिनेश वाघमारे, उपमहापौर शैलजा मोरे, माजी आमदार दिगंबर भेगडे, उपजिल्हाधिकारी मोनिका सिंग, नगरसदस्या सोनाली गव्हाणे, अश्विनी बोबडे, सुनीता तापकीर, रेखा दर्शिले, शर्मिला बाबर, सीमा चौघुले, निर्मला कुटे, सारिका मोराळे, सारिका बो-हाडे, निकिता कदम, मीनल यादव, सुजाता पालांडे, मनीषा पवार, सुलक्षणा शिलवंत धर, प्रियांका बारसे, संगीता भोंडवे, मुख्य लेखापरीक्षक पद्मश्री तळदेकर, सहायक आयुक्त आशादेवी दुरगुडे, चंद्रकांत इंदलकर, कामगार कल्याण अधिकारी अनिल जगदाळे, प्रशासन अधिकारी रेखा गाडेकर, कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी अंबर चिंचवडे, चारुशीला जोशी, रोहिणी गव्हाणकर, सीमा सुकाळे, अनिता मालपाठक, माया वाकडे, नयना दीक्षित माहिती व जनसंपर्कचे रमेश भोसले, किशोर केदारी उपस्थित होते.
उपमहापौर शैलजा मोरे म्हणाल्या, ‘‘खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले यांनी त्या काळात महिलांना सुशिक्षित केले. त्यामुळे पुढे सध्या उच्च शिक्षण घेऊ शकल्या. सध्या विविध क्षेत्रांत महिला उल्लेखनीय कार्य करीत आहेत. महात्मा फुले यांनी सावित्रीबाई फुले, तर डॉ. आंबेडकरांनी रमाई घडविली. महिलांना सर्व क्षेत्रांत सक्षम बनण्यासाठी पुरुषांनी त्यांना सर्वतोपरी मदत करावी.’’
मुलींनी नव्या क्षेत्रात पदार्पण केले पाहिजे. महिला व बालकल्याण विभाग महिलांसाठी विविध योजना राबवीत असतात. त्या योजनांचा सर्व महिलांनी सर्वांगीण विकासासाठी लाभ घ्यावा. महिलांच्या सबलीकरणासाठी महापालिका विविध कार्यशाळा घेत आहे त्याचाही सर्व महिलांनी लाभ घ्यावा, असे आयुक्त वाघमारे यांनी सांगितले. मुख्य लेखा परीक्षक पद्मश्री तळदेकर, कामगार नेते सुभाष सरीन यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या हस्ते कविता माने यांच्या रांगोळी चित्रांचे व संध्या वाघ यांच्या काव्यओळी असलेल्या रेखाचित्रांचे उद्घाटन झाले. त्यानंतर हे विघ्नहर्ता बाप्पा मोरया रे, तसेच रिद्धी सिद्धी वृद्धी होती, तेरे ही आने से ही गणेशवंदना सादर करण्यात आली. या नृत्यकला कृतीमध्ये कविता माने, रुपाली निकम, कुमोदिनी आरु, सरिता कुलकर्णी व मीनाक्षी गरुड यांनी सहभाग घेतला होता. सांगता जितेंद्र भुरूक यांच्या गीतो का सफर या आॅर्केस्ट्राने झाली. प्रास्ताविक चंद्रकांत इंदलकर यांनी केले. सूत्रसंचालन चारुशीला जोशी यांनी, तर आभार रेखा गाडेकर यांनी मानले. (प्रतिनिधी)