तुमच्यात हिंमत असेल तर शहीद हेमंत करकरे यांना भारतरत्न द्या : उमर खालिद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 03:55 PM2020-01-18T15:55:29+5:302020-01-18T15:56:37+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाजपवाले वाघ म्हणतात. आम्हाला वाघाची नव्हे तर माणसाची गरज आहे..
पिंपरी : भाजपवाले म्हणातात, सावरकरांना भारतरत्न देणार, तुमच्यात हिम्मत असेल तर शहीद हेमंत करकरे यांना भारतरत्न पुरस्कार द्या, असे आव्हान जेएनयूचे माजी विद्यार्थी उमर खालिद यांनी केंद्र सरकारला दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाजपवाले वाघ म्हणतात. आम्हाला वाघाची नव्हे तर माणसाची गरज आहे. ते वाघ असतील तर त्यांची जागा प्राणीसंग्रहालयात आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पिंपरी-चिंचवड संविधान बचाव समितीच्या वतीने नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि एनपीआर या कायद्याच्या विरोधात निषेध आयोजित करण्यात आली होती. या वेळी खालिद बोलत होते. मानव कांबळे, मारुती भापकर, अखिल मुजावर, प्रताप गुरव, सुरेश बेरी, माधव आव्हाड आदी या वेळी उपस्थित होते.
खालिद म्हणाले, ह्यह्यसीएए, एनआरसी आणि एनपीआर या कायद्यांविरोधात आम्ही देशभर शांततेत आंदोलन करणार आहोत. भाजपच ेसरकार असलेल्या राज्यांमध्ये या आंदालनात पोलिसांकडून लाठी चार्ज करण्यात येत आहे. महाराष्ट्रात मात्र पोलिसांकडून सहकार्य मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शांततेत आंदोलन सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांना सलाम. शहीद हेमंत करकरे यांचा आम्ही सन्मान करतो. मोदीजी तुम्ही सन्मान करीत असलेल्या पोलिसांमध्ये हेमंत करकरे यांचा समावेश आहे का?, भाजपाच्या प्रज्ञासिंग ठाकूर यांनी हेमंत करकरे यांना अपमानित केले. सत्ता आणि पैसा हा या लोकांचा एकमेव उद्देश आहे. त्यातूनच हे म्हणतात, आम्ही सावरकर यांना भारतरत्न देणार. तुमच्यात हिंमत असेल तर शहीद हेमंत करकरे यांना भारतरत्न द्या.
देशातील गरिबी, शेतकऱ्यांचे प्रश्न, विकासाचा मुद्दा यावरून नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी देशात हिंसा पसरविली जात आहे. संसदेतील बहुमताचा भाजपाला अहंकार आहे. मात्र जनता रस्त्यावर उतरून बहुमत सिद्ध करेल.
मै शेर नही हूँ इन्सान हूँ और इन्सान सोचता समझता है, गुजरात का शेर ना सोचता है ना समझता है, अशी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करून खालिद म्हणाला, आता सांगितलं जातंय कागदपत्रं दाखवा. आम्ही कागदपत्रं दाखवणार नाही. कोणत्याही अधिकाऱ्याला घरात येऊ देणार नाही,क्यूँ की हिंदुस्थानके साथ कागज का नहीं दिल का रिश्ता है.