लोहगडावरील सुरक्षेकडे होतेय दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 03:51 AM2017-08-01T03:51:49+5:302017-08-01T03:51:49+5:30

मागील काही वर्षांमध्ये मावळातील पर्यटन स्थळांकडे पर्यटकांचे लोंढे च्या लोंढे येत असून, त्यात लोहगड किल्ल्यावर पर्यटकांची संख्या मोठी वाढली आहे.

Ignorance is against the safety of the iron ore | लोहगडावरील सुरक्षेकडे होतेय दुर्लक्ष

लोहगडावरील सुरक्षेकडे होतेय दुर्लक्ष

Next

कामशेत : मागील काही वर्षांमध्ये मावळातील पर्यटन स्थळांकडे पर्यटकांचे लोंढे च्या लोंढे येत असून, त्यात लोहगड किल्ल्यावर पर्यटकांची संख्या मोठी वाढली आहे. पण त्यादृष्टीने पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासन उदासीन असल्याचे चित्र दिसत आहे.
इतिहासाची साक्ष देत उभा असलेल्या लोहगड किल्ल्यावर जाणाºया रस्त्याची गेल्या काही वर्षांमध्ये चांगली सुधारणा झाली असून, इतर अनेक सोईंमुळे किल्ल्यावर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. एरव्ही एकटा असणाºया या गडावर इतिहास प्रेमी, शिवप्रेमी, गड किल्ल्यांचे
संवर्धन करणाºया विविध संस्थांचे सभासद येत असत. पण मागील
काही वर्षांमध्ये वर्षविहारासाठी लोणावळा खंडाळ्यात दाखल होणाºया पर्यटकांना हा किल्ला खुणावू लागल्याने येथे शनिवार, रविवार व इतर सुटीच्या दिवशी मोठी गर्दी होत आहे.
किल्ल्याच्या पायथ्याला विविध दुकाने थाटली गेली असून, खाद्य पदार्थांच्या गाड्या व इतर वस्तूच्या दुकानदारीमुळे स्थानिकांना मोठा रोजगार निर्माण झाला आहे. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन शासनाच्या वतीने या किल्ल्यावर पाच गडपालकांची नेमणूक करण्यात आली आहे.
मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने या किल्ल्यावर कोणत्याही प्रकारची उपाययोजना नाही. दिवसभरात गडावर किती पर्यटक आले व त्यानंतर किती पर्यटक माघारी गेले, याची कोणत्याही प्रकारची नोंद येथे नसल्याने एखादा पर्यटक अनावधानाने रस्ता चुकून अथवा अपघात होऊन हरवला तर याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गडावर अनधिकृतपणे खाद्यपदार्थ बनवणे व विक्री करणे सुरू असून, गडावर गणेश दरवाजाच्या पुढील दरवाजाच्या दिवटीमध्ये हा व्यवसाय गडपाल यांच्या मर्जीने सुरू आहे. येथे वडापाव, चहा व इतर पदार्थ विकले जात आहेत.
काही पर्यटक नागरिकांशीही हुल्लडबाजी करतात. भरधाव
वाहने चालवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्याची आवश्यकता आहे. परंतु प्रशासन त्या कडे दुर्लक्ष करीत असल्याने हुल्लडबाजांची स्टंटबाजी वाढत चालली आहे. यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे, त्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का असा सवाल परिसरातील नागरिकांमधून विचारला जात आहे. प्रशासनाला जाग येणे गरजेचे आहे.

Web Title: Ignorance is against the safety of the iron ore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.