कर्मचा-यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष, स्वयंरोजगार संस्था आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 01:06 AM2017-12-27T01:06:39+5:302017-12-27T01:06:42+5:30
पिंपरी : शहरात महापालिकेअंतर्गत सफाई काम करणा-या ६८ संस्था आहेत. मागील काही महिन्यांपासून या संस्था विविध अडचणींमधून जात आहेत.
पिंपरी : शहरात महापालिकेअंतर्गत सफाई काम करणा-या ६८ संस्था आहेत. मागील काही महिन्यांपासून या संस्था विविध अडचणींमधून जात आहेत. महापालिका प्रशासन स्वच्छता कर्मचा-यांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने पिंपरी-चिंचवड, शहर स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थांचे फेडरेशन यांच्या वतीने संदीपान झोंबाडे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
शासनाच्या २००२ च्या आदेशानुसार बेरोजगारांच्या सेवा सह. संस्थांना रस्ते, नाले साफसफाईची कामे प्रतीक्षा यादीप्रमाणे देण्यात यावीत. पालिकेमार्फत बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थाकरिता काम वाटप समिती तयार करावी. बी. आर. गवई व कर्णिक यांच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार, आरोग्य विभागाची निविदा रद्द करून नव्याने निविदा प्रक्रिया राबवून त्यामध्ये बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थाना प्राधान्य देण्यात यावे. अत्यंत कमी दराने भरलेल्या व किमान वेतन कायद्याचे उल्लंघन करणाºया नियमबाह्य व सदोष निविदा रद्द कराव्यात, अशा मागण्या केल्या आहेत.