गायरानावर अतिक्रमण करून बांधले इमले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 01:25 AM2018-11-17T01:25:07+5:302018-11-17T01:26:28+5:30
मावळ तालुका : प्रशासनाला मिळेना शासकीय इमारतीसाठी जागा
वडगाव मावळ : मावळ तालुक्यात १२०० हेक्टर गायरान क्षेत्र आहे. त्याचा ताबा अनेक ग्रामपंचायतींकडे आहे. त्यातील काही गायरान जमिनींवर अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे शासनाच्या मालकीची जागा असूनदेखील विविध शासकीय कार्यालये, रुग्णालये बांधण्यासाठी जागेअभावी भटकण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. अनेक भागात काही पदाधिकाऱ्यांनी गायरान जमिनीवर अतिक्रमण केले आहे. काही ठिकाणी मोठमोठे बंगले उभारले आहेत.
तालुक्यातील तळेगाव दाभाडे, गोडुंब्रे, वराळे,आंबी शासनाने २०११ नंतर गायरान जमिनी खासगी अथवा वैयक्तिक प्रकल्पासाठी देणे बंद केले आहे. फक्त शासकीय अथवा सार्वजनिक हिताच्या दृष्टीने गायरान जमिनींचा वापर करण्याचा नियम लागू करण्यात आला आहे.
ज्या गावात गायरान आहे त्याची देखभाल ग्रामपंचायतीकडे असते. डोंगरगाव,कुसगाव बु. आदी भागासह काही ठिकाणी गायरानावर अतिक्रमण झाले आहे. तालुक्यात एक आरोग्य केंद्र व सात उपकेंद्र मंजूर आहेत.मात्र त्यासाठी केवळ जागा मिळत नसल्याने गेल्या चार वर्षांपासून आरोग्य केंद्र होऊ शकली नाहीत. तालुक्यात ७५ ग्रामपंचायतींपैकी उर्से, चिखलसे, पालेनामा, दिवड व पांगळोली या ठिकाणी ७० हेक्टरपेक्षा जास्त गायरान क्षेत्र असून, ५० ग्रामपंचायतीमध्ये १२ ते १५ हेक्टर क्षेत्र आहे. मावळ तालुक्यात कारवाई केल्यास अनेक जणांची पदे धोक्यात येण्याची शक्यता परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. गायरानावर अतिक्रमण करणाºयांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
संबंधितांवर कारवाई करणार
४गायरान जमिनीवर अतिक्रमण करणाºयांवर कारवाई केली जाईल. त्यात ते पदाधिकारी असतील, तर त्यांची पदे कायद्याने धोक्यात येऊ शकतात. गायरानातील जागा खासगी व वैयक्तिक वापरासाठी बंद केलेले आहे. सार्वजनिक वापरासाठी जागा मिळू शकते.त्यासाठी शासनाची परवानगी घेणे गरजेचे आहे, असे तहसीलदार रणजीत देसाई यांनी सांगितले.
४गायरान क्षेत्र असलेल्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे—-चिखलसे : ८१-३२ हेक्टर,उर्से : १८२-२० हेक्टर,पांगळोली : ११७-६१,पालेनामा : ९१ -४५, वडेश्वर : १७-६३,दिवड ७३-६२ सावळे २५-१७ ,धामणे १८-३,गोडुंब्रे १९-७१,वराळे 20 हेक्टर,सुदुंब्रे 20-48,नाणोली तर्फे चाकण 47-26,सुदवडी 22-22,भाजगाव 43-34,आढले बुद्रुक 23-5.