वायसीएममध्ये लवकरच अद्ययावत आयसीयू विभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 03:24 AM2019-03-11T03:24:04+5:302019-03-11T03:24:28+5:30

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) २५ खाटांचा अत्याधुनिक सोयींयुक्त अतिदक्षता विभाग (आयसीयू) सुरू केला जाणार आहे.

Immediately updated ICU department in YCM | वायसीएममध्ये लवकरच अद्ययावत आयसीयू विभाग

वायसीएममध्ये लवकरच अद्ययावत आयसीयू विभाग

googlenewsNext

पिंपरी : महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) २५ खाटांचा अत्याधुनिक सोयींयुक्त अतिदक्षता विभाग (आयसीयू) सुरू केला जाणार आहे. यापूर्वी १५ खाटांच्या क्षमतेचा एकच आयसीयू असल्याने रुग्णांचे हाल होत होते. परंतु, गेल्या महिन्यात नव्याने १८ खाटांच्या बेडच्या दुसऱ्या वॉर्डची उभारणी केली आहे. लवकरच २५ खाटांचा तिसरा अतिदक्षता विभाग सुरू होणार आहे. यामुळे चिंताजनक रुग्णांवर तत्काळ उपचार करणे सोईचे ठरणार असल्याने रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात शहरातून, तसेच इतर ठिकाणाहून येणाºया रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
रुग्णालयामध्ये अनेक विभाग उपलब्ध असून, अल्पदरात उपचार केले जातात. त्यामुळे जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या अनेक भागातून येथे रुग्ण उपचारासाठी येतात. यामुळे अनेकदा जागेअभावी रुग्णांची हेळसांड होत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. रुग्णालयात चिंताजनक रुग्ण सतत येत असल्याने त्याच्यावर तत्काळ उपचार करुन अतिदक्षता विभागात हलविण्याची गरज असते. परंतु, रुग्णालयात एकच आयसीयू विभाग कार्यरत असल्याने बहुतांश चिंताजनक रुग्णांवर सर्वसाधारण विभागात उपचार करण्याची वेळ प्रशासनावर येत होती. यामुळे आॅक्सिजन व इतर आवश्यक सुविधा वेळेत मिळत नसल्याने ते रुग्णांच्या जिवावर बेतण्याची शक्यता असते; परंतु, सद्य:स्थितीत आयसीयू वॉर्डची नव्याने उभारणी केल्याने रुग्णांना तत्काळ उपचार मिळणार आहेत. सध्या रुग्णालयातील दोन अतिदक्षता विभाग सुरू असून, तिसºया विभागाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या आयसीयूच्या वॉर्डमुळे चिंताजनक रुग्णांवर रुग्णालयात उपचार करणे सोईचे होणार आहे.

रुग्णालयात नेहमीच मोठ्या प्रमाणावर रुग्णांची गर्दी असते. रुग्णालयात क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण आल्यानंतर काही प्रमाणात अडचण निर्माण होत होती. नवीन अतिदक्षता विभाग सुरु झाल्याने रुग्णांची गैरसोय थांबणार आहे. तिसºया आयसीयूचे काम थोड्याच दिवसामध्ये पूर्ण होईल. त्यानंतर त्वरित तो विभाग रुग्णांसाठी सुरू केला जाईल.’’
- डॉ. शंकर जाधव, वैद्यकीय उपअधीक्षक, वायसीएम रुग्णालय

Web Title: Immediately updated ICU department in YCM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.