निगडीत बेशिस्त पार्किंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 01:20 AM2018-08-31T01:20:49+5:302018-08-31T01:23:12+5:30

वाहनचालकांंना त्रास : अतिक्रमण निर्मूलन व वाहतूक विभागाचे दुर्लक्ष

 Implicit unguarded parking in nigadi pune | निगडीत बेशिस्त पार्किंग

निगडीत बेशिस्त पार्किंग

Next

निगडी : निगडीतील बहुतांश रस्त्यांच्या दुहेरी बाजूस पदपथ आहेत; परंतु ते हातगाडीधारक व र्पाकिंगच्या कचाट्यात सापडले आहेत. त्यापैकी ज्या रस्त्यांवर पदपथ आहेत, त्यातील अर्ध्याअधिक पदपथावर सर्रास पक्की अतिक्रमणे झाली आहेत. जे काही पदपथ अतिक्रमणांपासून वाचले आहेत, त्यातील बहुतांश वापरण्याजोगे राहिलेले नाहीत. विशेषत: निगडीकडून त्रिवेणीनगरकडे जाणारा रस्ता, निगडीकडून प्राधिकरणाकडे जाणाऱ्या पदपथावर अतिक्रमणे झाली आहेत. परिणामी, वर्षानुवर्षे निगडीतील वाहतुकीचा कोंडलेला श्वास मोकळा होण्याऐवजी अजूनच कोंडला जात आहे आणि त्याचा नाहक त्रास सामान्य पादचाºयांना होत आहे.

शहरातील छोट्या-मोठ्या रस्त्यावरील पदपथांकडे दुर्लक्ष होत आहे. पदपथांवरील अतिक्रमणांकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. कधीतरी अतिक्रमणविरोधी कारवाई झालीच, तर दुसºया दिवशी स्थिती जैसे थे झाल्याशिवाय राहत नाही. गर्दीच्या ठिकाणी पदपथ आवश्यक असताना हातगाडीधारकांनी रस्त्याकडेला अतिक्रमण केल्याने वाहनचालकांची चांगलीच त्रेधा उडत आहे. अतिक्रमणांमुळे रस्ते अरुंद झाले आहेत. अरुंद रस्त्यामुळे रुग्णवाहिका जाण्यास-येण्यास वारंवार अडचणी येतात आणि गंभीर-अतिगंभीर रुग्णांच्या जिवाशी रोजचाच खेळ सुरू असतो. निगडी स्थानक परिसरातील रस्त्यांच्या कडेला पदपथ असून नसल्यासारखा झाला आहे. या भागात पदपथ नाहीसा झाल्यामुळे कोठेही वाहने थांबतात, रिक्षा-खासगी वाहनांची झुंबड असते. त्यामुळे पादचाºयांचे नेहमीच हाल होतात.
अनेक भागांमध्ये पदपथ असूनही त्यावर वाहने दिसून येतात. बेशिस्त वाहनचालकांकडून प्पदपथांवर पार्किंग केले जाते. निगडीकडुन दुर्गानगर चौक ते त्रिवेणीनगर चौकापर्यंत दोन्ही बाजुस पदपथ असून, पदपथाचा वापर चक्क दुचारी-चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी होतो. या रस्त्यावरील पदपथावरून पादचारी चालू शकत नाही, अशी भयंकर स्थिती आहे. याकडे संबंधित यंत्रणांचे कायमचे दुर्लक्ष आहे.
भेळ चौक परिसरात काही बँकांची शाखा कार्यालये आहेत. त्यांना पार्किंगची व्यवस्था नाही. परिणामी बँकेत येणारे ग्राहक वाहने बँकेसमोर भर रस्त्यात अथवा पदपथावर पार्किंग करतात. यामुळे या ठिकाणी वाहतुकीच्या समस्या व किरकोळ आपघात वांरवार घडत असतात. बँकेसमोरच असलेल्या पदपथावर फळविक्रेते व खाद्यपदार्थांच्या हातगाड्या असल्याचे दिसून येते.
त्यामुळे पादचाºयांना कसरत करावी लागते. मात्र याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.

पदपथावर टपºया, गाड्या, दुकाने
शहरातील बहुतांश पदपथांवर छोट्या-मोठ्या टपºया, गाड्या, दुकाने थाटण्यात आली आहेत. मात्र अगदी दोन्ही बाजूंनी असलेल्या प्रचंड प्रमाणातील अतिक्रमणांनी पदपथ अक्षरश: गिळंकृत केले आहेत. या फूटपाथवर हॉटेल, चहा-नाष्ट्याच्या टपºया, फळांच्या गाड्या, कपड्यांची छोटी दुकाने, नारळपाण्याच्या गाड्या याबरोबरच चक्क फूटपाथवर किंवा लगतच थाटण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून येते. सगळ्यात वाईट म्हणजे पदपथवर पूर्णपणे अतिक्रमण आहेच; शिवाय पदपथापासून थेट रस्त्यावर पुन्हा दहा-दहा फुटांपर्यंत हातगाड्यांची अतिक्रमणे आहेत. त्यामुळे पादचाºयांना रस्त्यांवरूनच जावे लागते आणि दुहेरी अतिक्रमणामुळे मूळचा रस्ता अरुंद झाला आहे.

Web Title:  Implicit unguarded parking in nigadi pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.