शेती विभागातील कर्मचारी महत्त्वाचा दुवा

By admin | Published: September 2, 2015 03:59 AM2015-09-02T03:59:55+5:302015-09-02T03:59:55+5:30

साखर कारखाना कार्यक्षेत्र व परिसरातील शेतकऱ्यांना त्यांच्या समस्यांवर मार्गदर्शन करताना कर्मचारी ज्ञानाने परिपूर्ण असणे आवश्यक असते. प्रत्यक्ष शेतावर

An important link to the staff in the farming sector | शेती विभागातील कर्मचारी महत्त्वाचा दुवा

शेती विभागातील कर्मचारी महत्त्वाचा दुवा

Next

अवसरी : ‘‘ साखर कारखाना कार्यक्षेत्र व परिसरातील शेतकऱ्यांना त्यांच्या समस्यांवर मार्गदर्शन करताना कर्मचारी ज्ञानाने परिपूर्ण असणे आवश्यक असते. प्रत्यक्ष शेतावर काम करताना कर्मचाऱ्यांकडील माहिती काळानुरूप परिपूर्ण असणे आवश्यक असते. शेती विभागात काम करणारे कर्मचारी म्हणजे
कारखाना व ऊस उत्पादक शेतकरी यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे,’’ असे प्रतिपादन प्रदीप वळसे पाटील यांनी केले.
पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर कारखान्याच्या ऊस
विकास विभागाने तयार केलेल्या आधुनिक ऊस शेती पुस्तिकेचे प्रकाशन भीमाशंकर सहकारी
साखर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील व मान्यवरांच्या
हस्ते करण्यात आले. यावेळी ते
बोलत होते.
पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखाना दत्तात्रयनगर येथे शेतकरी विभागातील कर्मचाऱ्यांसाठी
प्रशिक्षण कार्यक्रम भीमाशंकर
साखर कारखाना व नेटाफिम इंडिया कंपनी यांच्या विद्यमाने झाला.
यावेळी वरिष्ठ व्यवस्थापक अरुण देशमुख,चंद्रकांत ढगे, संचालक अशोक घुले, चंद्रकांत ढोबळे, ऊस विकास अधिकारी नारायण लगड, नेटाफिम कंपनीचे विशाल भालेराव, शैलेश दगडे उपस्थित होते.
सहायक ऊस विकास अधिकारी दिनकर आवक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शेतकरी
अधिकारी अंकुश आढाव यांनी आभार मानले. (वार्ताहर)

Web Title: An important link to the staff in the farming sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.