आयुष्यात जिद्द असणे महत्त्वाचे : विद्यासागर
By admin | Published: January 23, 2017 02:53 AM2017-01-23T02:53:21+5:302017-01-23T02:53:21+5:30
तंत्रज्ञानामुळे आज जग पुढे चालले आहे. शहरी भागाची मक्तेदारी मोडीत काढून ग्रामीण भागातील विद्यार्थी आज सर्व क्षेत्रांत मोठे
रावेत : तंत्रज्ञानामुळे आज जग पुढे चालले आहे. शहरी भागाची मक्तेदारी मोडीत काढून ग्रामीण भागातील विद्यार्थी आज सर्व क्षेत्रांत मोठे यश मिळवत आहेत. माणसाच्या आयुष्यात जिद्द असणे महत्त्वाचे असते, असे प्रतिपादन नांदेड विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी केले.
आकुर्डीतील डॉ. डी. वाय. पाटील सोसायटीचे, डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान व डॉ. डी. वाय. पाटील संगणक महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलन कार्यक्रम ते बोलत होते. ते म्हणाले, कोणताही विषय आपणास समजला असे तेव्हाच समजावे जेव्हा तो आपण इतरांना समजावून सांगू माणसाच्या आयुष्यात प्रज्ञा, शील, करुणा, स्वातंत्र्य, समता, बंधूता या मूल्यांची जपणूक होणे महत्त्वाचे आहे. तंत्रज्ञान विज्ञान व क्षमता या प्रत्येक पायरीवर आपल्या देशाची तरुणाई विश्वासाने पाऊल टाकत आहे. प्रत्येकाने आयुष्यात माझ्यासाठी नव्हे, तर इतरांसाठी या विचाराने चालल्यास संपूर्ण जग एका कुटुंबासारखे होईल असेही त्यांनी नमूद केले.
या वेळी डॉ. रवींद्र जायभाये, प्राचार्य डॉ. मोहन वामन, प्राचार्य डॉ. रणजीत पाटील, प्राचार्य डॉ. स्नेहल अग्निहोत्री हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी कल्याण मंडळ प्रमुख प्रा. मुकेश तिवारी, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. विजय गाडे, प्रा. गणेश फुंदे, महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक किशोर पाटील,
सहायक कुलसचिव ज्ञानेश्वर सावंत, प्रा.राजेश भगत व इतर प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.
शरद बोडखे, प्रा. स्वप्ना वाडकर यांनी केले, तर आभार प्रा. मुकेश तिवारी यांनी मानले. (वार्ताहर)