सरकारच्या विरोधात संतप्त आक्रोश करत केले मुंडण, मराठा समाजाने घातला सरकारचा दहावा

By विश्वास मोरे | Published: October 31, 2023 05:54 PM2023-10-31T17:54:37+5:302023-10-31T17:59:49+5:30

सरकार आरक्षण मागणी मान्य करू शकले नाही. त्यामुळे पुन्हा उपोषण सुरू करावे लागले, आज पुन्हा सात दिवस झाले, तरी सरकार निर्णय घेऊ शकले नाही. त्यामुळे मराठा समाजात प्रचंड संताप निर्माण झाला आहे...

In an angry outcry against the government, they shaved their heads, the Maratha community wore the tenth of the government | सरकारच्या विरोधात संतप्त आक्रोश करत केले मुंडण, मराठा समाजाने घातला सरकारचा दहावा

सरकारच्या विरोधात संतप्त आक्रोश करत केले मुंडण, मराठा समाजाने घातला सरकारचा दहावा

पिंपरी : पिंपरी चिंचवडमधील पवना नदी तीरावरील मोरया गोसावी घाटावर मराठा समाजाने राज्य सरकारचा दशक्रिया विधी असे आंदोलन केले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आरक्षणाच्या महाराष्ट्रभर विविध ठिकाणी आमरण उपोषण व साखळी उपोषण सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३० दिवसांत आरक्षण मागणी मान्य करतो, असे आश्वासन दिले होते. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला ४० दिवसांचा वेळ दिला व आंदोलन स्थगित केले. सरकार आरक्षण मागणी मान्य करू शकले नाही. त्यामुळे पुन्हा उपोषण सुरू करावे लागले, आज पुन्हा सात दिवस झाले, तरी सरकार निर्णय घेऊ शकले नाही. त्यामुळे मराठा समाजात प्रचंड संताप निर्माण झाला आहे.

चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिराशेजारील स्मशानभूमीत मंगळवारी शहरातील मराठा समाज प्रचंड संख्येने एकत्र आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासहीत महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार यांचा निषेध करण्यासाठी मराठा समाजाने दशक्रिया विधी कार्यक्रम केला. दशक्रिया विधी करून सतीश काळे, नाना वारे, रमेश कदम यांनी मुंडण केले. याप्रसंगी मीरा कदम, सुनीता शिंदे यांच्यासहीत उपस्थित अनेक महिला भगिनींनी प्रचंड मोठा आक्रोश केला.

मराठा समाजाची फसवणूक करतेय सरकार

सरकार मराठा समाजाची फसवणूक करीत आहे, अशी टीका केली. यावेळी सरकारच्या नाकर्तेपणाबद्दल शोकाकुल वातावरणात मराठा समाज कार्यकर्ते प्रकाश जाधव, मारुती भापकर, धनाजी येळकर पाटील, कल्पना गिड्डे, राजाभाऊ गोलांडे, काशिनाथ जगताप, मानव कांबळे यांनी श्रद्धांजली वाहिली. सूरज भोईर व संपत पाचुंदकर यांनी पसायदान म्हटले. याप्रसंगी वैभव जाधव, नकुल भोईर, पांडुरंग प्रचंड राव, रेखा देशमुख, गणेश सरकटे, रत्नप्रभा सातपुते, अशोक सातपुते, प्रकाश बाबर, किरण खोत, संपतराव जगताप, संजय जाधव, सचिन पवार, ब्रह्मानंद जाधव, विष्णू कराळे, नलिनी पाटील, सुनील गव्हाणे, शीतल घरात, रावसाहेब गंगाधरे, सुनील शिंदे, सागर चिंचवडे, सूरज भोईर, बाबा भोईर, जालिंदर खतकर उपस्थित होते.

Web Title: In an angry outcry against the government, they shaved their heads, the Maratha community wore the tenth of the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.