Pune | चोरट्यांसमोर तरुणाचा रुद्रावतार, दीड लाख टाकून चोरटे पळाले; नेमक काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 09:36 PM2022-12-12T21:36:20+5:302022-12-12T21:37:27+5:30

डोळ्यात मिरची पूड टाकून कोयत्याने हल्ला तरीही...

In front of the thieves, the young man angry leaving one and a half lakhs; What exactly happened? | Pune | चोरट्यांसमोर तरुणाचा रुद्रावतार, दीड लाख टाकून चोरटे पळाले; नेमक काय घडलं?

Pune | चोरट्यांसमोर तरुणाचा रुद्रावतार, दीड लाख टाकून चोरटे पळाले; नेमक काय घडलं?

Next

पिंपरी : डोळ्यात मिरचीची पूड टाकून तसेच कोयत्याने हल्ला करत लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांनी तरुणाचा रुद्रअवतार पाहून दीडलाख रुपये आणि आपली दुचाकी तेथेच टाकून पळ काढला. ही घटना शनिवारी (दि.१०) सायंकाळी सातच्या सुमारास मोरवाडी, पिंपरी येथे घडली. या प्रकरणी जानी आकाशकुमार विष्णुप्रसाद (वय ३०, रा.मोरवाडी) यांनी रविवारी (दि.११) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी दोन दुचाकी वरून आलेल्या अज्ञात चार चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे मित्र पृथ्वीराज राठोड यांनी टायरच्या दुकानातील दिवसभर जमा झालेले दीड लाख रुपयांचे कलेक्शन त्यांच्याकडील ॲक्टीवा गाडीच्या डिक्कीत ठेवले होते. फिर्यादी हे आपल्या मित्रासोबत या गाडीवरून घरी जात असताना निळ्या रंगाच्या पल्सर गाडीवरवरून दोघे जण आणि दुसऱ्या एका दुचाकीवरून दोघे जण फिर्यादीच्या गाडीच्या जवळ आले.

आरोपींनी त्याच्या जवळील मिरचीपूड फिर्यादीच्या डोळ्यात टाकली व हातावर उलटा कोयता मारला. तसेच फिर्यादीचा मित्र पृथ्वीराज याच्या हाताच्या कोपऱ्यावर उलटा कोयता मारून गाडीची डिक्की खोलण्यास सांगून कोयत्याचा धाक दाखवला. दोन आरोपी फिर्यादीची गाडी घेऊन जात होते. त्यावेळी जवळ कंट्रक्शनचे काम सुरू होते. फिर्यादीने तेथे असलेला फावडा घेऊन आरोपींच्या अंगावर धावून गेले. आरोपींनी फिर्यादीची ॲक्टीव्हा गाडी आणि त्यांच्या जवळील पल्सर गाडी तेथेच टाकून पळ काढला. तर दुसरे दोघे आरोपी त्यांच्याजवळील दुचाकीवरून पळून गेले.

Web Title: In front of the thieves, the young man angry leaving one and a half lakhs; What exactly happened?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.