Pimpri Hit & Run Case: भरधाव कारने पादचारी महिलेला उडवले; कारचालकाला ठोकल्या बेड्या

By नारायण बडगुजर | Published: July 22, 2024 07:24 PM2024-07-22T19:24:19+5:302024-07-22T19:29:29+5:30

अपघात झाल्यानंतर कारचालक घटनास्थळी न थांबता कारसह पळून गेला

in pimpri chinchwad car driver hit women after and run away | Pimpri Hit & Run Case: भरधाव कारने पादचारी महिलेला उडवले; कारचालकाला ठोकल्या बेड्या

Pimpri Hit & Run Case: भरधाव कारने पादचारी महिलेला उडवले; कारचालकाला ठोकल्या बेड्या

पिंपरी : भरधाव कारने पादचारी महिलेला धडक दिली. त्यानंतर कारचालक न थांबता कार घेऊन पळून गेला. पिंपरी गावात रविवारी (दि. २१) दुपारी सव्वा एकच्या सुमारास हा ‘हिट अँड रन’चा प्रकार घडला. कारचालकाला पिंपरी पोलिसांनी अटक केली.

हरीश जालिंदर वाघमारे (२०, रा. रहाटणी) असे अटक केलेल्या कार चालकाचे नाव आहे. विजया कुमार नायर (५६, रा. वाघेरे काॅलनी, पिंपरीगाव) असे जखमी महिलेचे नाव आहे. शरण्या सौरभ तिवारी (३१, रा. पिंपळे सौदागर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार बीएनएस कलम २८१, १२५ (अ) मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/१७७ अन्वये पोलिसांनी गुन्हा नोंद केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजया नायर शिक्षिका असून क्लास झाल्यानंतर त्या पिंपरी गावात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्मारक चौक येथून महालक्ष्मी मंदिराजवळून पिंपळे सौदागर रस्त्यावरून पायी चालत जात होत्या. त्यावेळी त्यांच्या समोरून पिवळी नंबर प्लेट असलेली कार आली. कारने नायर यांना धडक दिली. या अपघातात त्या उडून रस्त्याच्या बाजूला पडल्या. त्यांच्या अंगावर दुचाकी पडली तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी त्यांना पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले.

नायर यांना धडक दिल्यानंतर कारने एक रिक्षा आणि एका दुचाकीला देखील धडक दिली. अपघात झाल्यानंतर कारचालक घटनास्थळी न थांबता कारसह पळून गेला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजवरून कारचा माग काढून चालकाची ओळख पटवली. त्याला ताब्यात घेतले.

पिंपरीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कडलग म्हणाले, ‘‘घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कार चालकाला पकडण्यासाठी तात्काळ पथके रवाना करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार चालकाला ताब्यात घेतले आहे."

Web Title: in pimpri chinchwad car driver hit women after and run away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.