पिंपरी-चिंचवडमध्ये ‘एलजीबीटीं’नी रॅलीतून व्यक्त केला ‘अभिमान’ 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 12:04 PM2022-12-19T12:04:41+5:302022-12-19T12:05:20+5:30

दीडशेवर एलजीबीटी व्यक्ती रॅलीत सहभागी झाले होते...

In Pimpri-Chinchwad, 'LGBTs' expressed their 'pride' through a rally. | पिंपरी-चिंचवडमध्ये ‘एलजीबीटीं’नी रॅलीतून व्यक्त केला ‘अभिमान’ 

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘एलजीबीटीं’नी रॅलीतून व्यक्त केला ‘अभिमान’ 

googlenewsNext

पिंपरी : समलिंगी, उभयलिंगी, पारलिंगी, द्विलिंगी आणि इतर लैंगिक (एलजीबीटी) अल्पसंख्यांक समुदायाकडून पिंपळे सौदागर येथे रविवारी (दि. १८) अभिमान यात्रा काढण्यात आली. नका करू दुजेपणा हिजड्यांनाही आपले म्हणा,  प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, ‘हमे हमारे हक दो जिओ और जिने दो’, ‘मारो ताली बजाओ सिटी एलजीबीटी-एलजीबीटी’ अशा विविध घोषणा यावेळी देण्यात आल्या.  

एलजीबीटी समुदायाच्या हक्कांसाठी व विविध मागण्यांसाठी गेल्या काही वर्षांपासून लढा सुरू आहे. राज्यात पोलीस भरती प्रक्रियेत तृतीयपंथींना सामावून घेण्यात आले. त्यामुळे या समुदायाला मोठा दिलासा मिळाला. त्यानिमित्त ही अभिमान यात्रा काढण्यात आली. पिंपरी-चिंचवड, पुणे, सातारा तसेच इतर शहरातील विविध संघटनांनी या रॅलीत सहभाग घेतला. दीडशेवर एलजीबीटी व्यक्ती रॅलीत सहभागी झाले होते. 

युतक ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अनिल उकरंडे म्हणाले, समाजातील एलजीबीटी व्यक्तींना कळले पाहिजे की ते एकटे नाहीत. त्यांच्यासोबत इतर एलजीबीटी व्यक्तीही आहेत. तसेच समाजाच्या मुख्य प्रवाहातील प्रत्येक घटकालाही कळले पाहिजे की एलजीबीटी व्यक्तींचेही अस्तित्व आहे. या व्यक्तीही इतरांसारख्याच आहेत. प्रत्येक क्षेत्रात काम करण्यास एलजीबीटी सक्षम आहेत. एलजीबीटींनाही सर्वच ठिकाणी कामाची समान संधी दिली पाहिजे.

Web Title: In Pimpri-Chinchwad, 'LGBTs' expressed their 'pride' through a rally.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.