सिंहगड एक्स्प्रेसमध्ये ऐनवेळी डब्यांची जागा बदलली, प्रवाशांची धावपळी; तीन जण जखमी, एक गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 08:50 PM2023-10-17T20:50:46+5:302023-10-17T20:53:01+5:30

दररोज हजारो नागरिक पुणे-मुंबई-पुणे प्रवास करतात...

In Sinhagad Express, coaches were changed on time, passengers rushed; Three injured, one seriously | सिंहगड एक्स्प्रेसमध्ये ऐनवेळी डब्यांची जागा बदलली, प्रवाशांची धावपळी; तीन जण जखमी, एक गंभीर

सिंहगड एक्स्प्रेसमध्ये ऐनवेळी डब्यांची जागा बदलली, प्रवाशांची धावपळी; तीन जण जखमी, एक गंभीर

पिंपरी : पिंपरी रेल्वे स्थानकावर मंगळवारी सिंहगड एक्स्प्रेसच्या डब्यांची जागा ऐनवेळी बदलल्यामुळे दररोज पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची धावपळ झाली. यात गाडी पकडताना एक प्रवासी गंभीर तर इतर दोन ते तीन प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती प्रवाशांनी दिली.

दररोज हजारो नागरिक पुणे-मुंबई-पुणे प्रवास करतात. पिंपरी-चिंचवड शहरातून मुंबईला जाण्यासाठी सकाळी केवळ सह्याद्री एक्स्प्रेस ही एकमेव रेल्वे आहे. मंगळवारी सकाळी ६ वाजून २० मिनिटांनी सह्याद्री एक्स्प्रेस पिंपरी रेल्वे स्थानकावर आली. पण, स्थानकावर इंडिकेटरवर दाखवलेल्या रेल्वे डब्यांच्या स्थितीपेक्षा या गाडीचे तीन डबे पुढे उभे राहिले होते. त्यामुळे स्थानकावरील प्रवाशांची तारांबळ उडाली. काही प्रवाशांनी गाडीची गती कमी झाल्यावर ती पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एक प्रवासी खाली पडला. यात तो जखमी झाला, तर काही प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्याचे प्रवाशांनी सांगितले.

इंडिकेटरवर दाखवलेल्या डब्यांच्या जागेप्रमाणे रेल्वे न थांबण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने याचा विचार करून रेल्वे इंडिकेटरप्रमाणे थांबण्याची व्यवस्था करावी.

- इक्बाल मुलाणी, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघ

जागेसाठी प्रवाशांनी चालती गाडी पकडणे धोकादायक आहे. यामुळे प्रवाशांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. प्रवाशांनी गाडी थांबल्यानंतरच आत प्रवेश करावा.

- रामदास भिसे, जनसंपर्क अधिकारी, पुणे रेल्वे विभाग

Web Title: In Sinhagad Express, coaches were changed on time, passengers rushed; Three injured, one seriously

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.