MHADA चे घर देण्याचे सांगून पिता-पुत्राने घातला गंडा, पिंपरीतील घटना
By नारायण बडगुजर | Published: September 27, 2023 05:45 PM2023-09-27T17:45:04+5:302023-09-27T17:45:43+5:30
हा प्रकार २४ जून २०२२ ते २६ सप्टेंबर २०२३ या कालावधीत पिंपरी येथे घडला...
पिंपरी : म्हाडाचे घर मिळवून देतो, असे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर दोन लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी पिता-पुत्रावर गुन्हा दाखल केला. हा प्रकार २४ जून २०२२ ते २६ सप्टेंबर २०२३ या कालावधीत पिंपरी येथे घडला.
जितेंद्र नामदेव कांबळे (४१, रा. कोल्हापूर) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि. २६) फिर्याद दिली. त्यानुसार उमाकांत रामदास ढाके (५४, रा. पिंपरी) व शुभम उमाकांत ढाके (२७, रा. पिंपरी) या पिता-पुत्रावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कांबळे यांना ढाके पिता-पुत्राने कोणताही अधिकार नसताना म्हाडामधून घर मिळवून देतो, असे आमिष दाखवले.
त्यासाठी फिर्यादी कांबळे यांच्याकडून तीन लाख रुपये घेतले. मात्र घर दिले नाही. पैशांची मागणी केली असता केवळ एक लाख रुपये परत केले. फिर्यादी कांबळे यांची दोन लाख रुपयांची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे. सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नाली पलांडे तपास करीत आहेत.