पूल पाण्याखाली गेल्याने गैरसोय

By admin | Published: June 28, 2017 04:03 AM2017-06-28T04:03:57+5:302017-06-28T04:03:57+5:30

रविवार पहाटेपासून पवन मावळात होत असलेल्या जोरदार पावसाने पवना नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने

Inconvenience to the pool going underwater | पूल पाण्याखाली गेल्याने गैरसोय

पूल पाण्याखाली गेल्याने गैरसोय

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गहुंजे : रविवार पहाटेपासून पवन मावळात होत असलेल्या जोरदार पावसाने पवना नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सोमवारी रात्री गहुंजे-साळुंब्रे गावांना जोडणाऱ्या साकव पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे.
पूल पाण्याखाली गेल्याने पंचक्रोशीतील शेतकरी व कामगार वर्गाची मोठी गैरसोय झाली आहे. पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली असल्याने मंगळवारी सकाळी घराबाहेर पडलेल्या शेतकरी व कामगारांना ९-१० किलोमीटरचा वळसा घालून घरी जावे लागले. तसेच शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय वाढली असून पायपीट वाढली आहे. नवीन पूल बांधण्यासाठी शासनाला जाग कधी येणार, असा सवाल स्थानिकांतून उपस्थित केला जात आहे. गहुंजे - साळुंब्रे साकव पूल पाण्याखाली गेल्याने सोमवारपासून गहुंजे, मामुर्डी, रावेत, देहूरोड, किवळे, विकासनगर आदी भागातील विद्यार्थ्यांना साळुंब्रेतील ग्रामप्रबोधिनी विद्यालयात येण्या-जाण्यासाठी सोमाटणे फाटा मार्गे नऊ -दहा किलोमीटरचा वळसा घालून जावे लागणार आहे. पिंपरी-चिंचवड परिसरात शाळा महाविद्यालयात येणारे विद्यार्थी औद्योगिक क्षेत्रात जाणारे कामगार, भाजी मंडई तरकारी, फुले घेऊन येणारे शेतकरी, दूध व्यावसायिक व ग्रामस्थांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे. सर्वांना सुमारे दहा किलोमीटरचा वळसा घालून ये-जा करावी लागत आहे.

Web Title: Inconvenience to the pool going underwater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.