उसाच्या लागवडीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 11:48 PM2018-08-27T23:48:11+5:302018-08-27T23:48:41+5:30
शेती महामंडळ : पाण्याच्या कोट्यात वाढ करण्याचा अहवाल
पुणे : शेती महामंडळातर्फे शेतकऱ्यांना दिल्या जाणाºया खंडकरी क्षेत्रात यंदा सुमारे ६ हजार एकर अतिरिक्त उसाची लागवड झाली आहे. त्यामुळे खंडकरी शेतकºयांसाठी दिल्या जाणाºया पाण्याच्या कोट्यात वाढ करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे या संदर्भातील सखोल अहवाल तयार करून तो पाटबंधारे विभागाने कालवा सल्लागार समितीपुढे सादर करावा, असे आदेश कुळकायदा शाखेचे उपजिल्हाधिकारी विजयकुमार देशमुख यांनी दिले आहेत.
खंडकरी शेतकºयांच्या प्रश्नांसंदर्भात देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली. त्यात खंडकरी शेतकºयांना पाटबंधारे विभागाकडून योग्य प्रकारे पाणीपुरवठा केला जावा तसेच पाणी पुरवठ्याचे नियोजन केले जावे, आदी विषयांवर चर्चा झाली. या वेळी शेती राज्य महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ जोशी, पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता बी. के. शेटे, उपकार्यकारी अभियंता वि. रा. पाटील, एस.एफ. भोसले, खंडकरी शेतकरी प्रतिनिधी अशोक पाटील, हर्षवर्धन गायकवाड आदी उपस्थित होते. काही वर्षांपासून महामंडळाच्या जमिनीमध्ये शेतकºयांना दिलेल्या जमिनींमध्ये उत्पादनच घेतले नाही. कालव्याद्वारे सोडण्यात येणारे पाणी वाहून गेले. परिणामी जमिनी नापिक झाल्या आहेत. त्याबाबत तपासणी करण्याचे आदेशही दिले आहेत.
शेती महामंडळाचे करारधारक यामध्ये नियमानुसार ठरवून दिलेल्या हिश्श्यामध्ये बदल करून अतिरिक्त पाणी वाढवून द्यावे. नीरा डाव्या कालव्यातून तत्काळ आवर्तन सुरू करावे. नीरा नदीवरील वालचंदनगर येथील खंडकरी शेतकºयांशी निगडित बंधाºयांची देखभाल व दुरुस्ती करावी, आदी मागण्यांवर झालेल्या विषयांवर पुढील बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असेही देशमुख यांनी सांगितले.