एलबीटी बंद होऊनही वाढले उत्पन्न, २०० कोटींची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 03:44 AM2018-04-02T03:44:52+5:302018-04-02T03:44:52+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील एलबीटीची वसुली बंद होऊन वस्तू आणि सेवाकर अस्तित्वात आला. या माध्यमातून महापालिकेला मिळणारे उत्पन्न सुमारे २०० कोटींनी वाढले आहे. वर्षाअखेरीस मुद्रांक शुल्क, एलबीटी आणि अनुदानातून १६२१.७८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील एलबीटीची वसुली बंद होऊन वस्तू आणि सेवाकर अस्तित्वात आला. या माध्यमातून महापालिकेला मिळणारे उत्पन्न सुमारे २०० कोटींनी वाढले आहे. वर्षाअखेरीस मुद्रांक शुल्क, एलबीटी आणि अनुदानातून १६२१.७८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
पिंपरी-चिंचवड ही औद्योगिक नगरी. महापालिकेला गेल्या वर्षी एलबीटीतून १४१० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. या वर्षी त्यामध्ये २११ कोटींची वाढ झाली आहे. महापालिकेला दर महिन्याला राज्य सरकारकडून मुद्रांक शुल्क मिळत होते. या आर्थिक वर्षात पहिल्या तीन महिन्यांत दीडशे कोटींचे अनुदान मिळाले आहे; तर एलबीटी प्रतिपूर्ती अनुदान पहिल्या तीन महिन्यांत दोनशे कोटी रुपये मिळाले आहेत.
महापालिकेला दरमहा १२८ कोटी ९७ लाख रुपयांचे अनुदान मिळते. जीएसटी लागू झाल्यापासून गेल्या नऊ महिन्यांत महापालिकेला १०४६.१० कोटी रुपयांचे अनुदान राज्य सरकारकडून मिळाले आहे. या आर्थिक वर्षात एलबीटीतून महापालिकेला १६२२ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पन्नामध्ये २११.२५ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. मुद्रांक शुल्क आणि अनुदानातही वाढ झाली आहे. त्यामुळे उद्दिष्टापेक्षा दोनशे कोटींची भर उत्पन्नात पडली आहे.
राज्य सरकारकडून महापालिकेला अनुदान
एक जुलै २०१७ पासून देशभरात वस्तू व सेवाकराची (जीएसटी) अंमलबजावणी सुरू झाली. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही त्याची अंमलबजावणी सुरू झाली. त्यामुळे यापूर्वी वसूल करण्यात येणारा प्रवेशकर, स्थानिक संस्था कर, जकात, उपकर किंवा इतर सर्व कर बंद केले. त्यापोटी दर महिन्याला राज्य सरकारकडून पालिकेला अनुदान दिले जाते. एलबीटी बंद झाल्यावर उत्पन्न घटणार असे मत होते; मात्र, उत्पन्नात वाढ झाली आहे.