आठवडे बाजारात पोलिसांची संख्या वाढवा

By admin | Published: March 30, 2017 02:22 AM2017-03-30T02:22:24+5:302017-03-30T02:22:24+5:30

मावळातील सर्वांत मोठा आठवडेबाजार अशी ख्याती असलेल्या लोणावळा आठवडेबाजारात मागील काही

Increase the number of police in the market for weeks | आठवडे बाजारात पोलिसांची संख्या वाढवा

आठवडे बाजारात पोलिसांची संख्या वाढवा

Next

लोणावळा : मावळातील सर्वांत मोठा आठवडेबाजार अशी ख्याती असलेल्या लोणावळा आठवडेबाजारात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटना, तसेच छेडछाडीचे प्रकार वाढले आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दर शुक्रवारी शहरातील पुरंदरे ग्राउंडवर भरणाऱ्या आठवडे बाजारात पोलिसांचे संख्याबळ वाढवावे, अशी लेखी मागणी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी शहर पोलिसांकडे केली आहे.
लोणावळ्यातील आठवडे बाजारात शहरासह परिसरातील ग्रामीण परिसरातील नागरिक भाजी घेण्यासाठी येतात. या बाजारात भाजीपाल्यासह कडधान्य, गृहोपयोगी वस्तू, कपडे, सौंदर्य प्रसाधने इत्यादी वस्तूंची देखील विक्री होत असल्याने खरेदीसाठी मोठी गर्दी असते. सायंकाळच्या सुमारास जवळपासच्या महिला, नागरिक खरेदीसाठी बाजारात येतात. अंधाराचा फायदा घेत चोरटे चोऱ्या करतात, तसेच महिलांना धक्काबुक्की करण्याचे प्रकार वाढले आहे. नगर परिषदेने बाजार व्यवस्थापनासाठी १० कर्मचारी नियुक्त केले आहेत. मात्र चोरी व अन्य घटना रोखण्यासाठी, तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता बाजाराच्या दिवशी अतिरिक्त बंदोबस्त नेमण्याची मागणी जाधव यांनी केली आहे.
या वेळी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, शिक्षण मंडळाचे माजी सभापती विनय विद्वांस, सामाजिक कार्यकर्त्या शैलजा फासे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
चोरीच्या अफवा
मावळात सध्या चोरट्यांच्या अफवादेखील मोठ्या प्रमाणात पसरल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. पोलीस बंदोबस्त वाढला तर नागरिकांमधील भिती कमी होण्यास मदत होईल.

Web Title: Increase the number of police in the market for weeks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.