पाणीपुरवठा जमा-खर्च तुटीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 02:01 AM2018-02-24T02:01:39+5:302018-02-24T02:01:39+5:30
शहराच्या पाणीपुरवठ्यावर भांडवली खर्च जास्त होत आहे. खर्चापेक्षा उत्पन्न अत्यंत कमी आहे. पाणीपट्टी वाढ सुचविली आहे. त्यामध्ये किती टक्क्यांनी वाढ होते
पिंपरी : शहराच्या पाणीपुरवठ्यावर भांडवली खर्च जास्त होत आहे. खर्चापेक्षा उत्पन्न अत्यंत कमी आहे. पाणीपट्टी वाढ सुचविली आहे. त्यामध्ये किती टक्क्यांनी वाढ होते. यावर अवलंबून आहे. भविष्याच्या दृष्टीने पाणीपुरवठ्यावर जास्त खर्च करावा लागणार आहे. त्यासाठी अधिक गुंतवणूक करणे गरजेचे आहे़ तसेच पाणीपट्टीत वाढही आवश्यक आहे, याबाबतचा निर्णय सर्वसाधारण सभेसमोर आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.
प्रशासनाने मालमत्ता व पाणीपुरवठा लाभ करात वाढ सुचविली होती. याबाबतचा निर्णय सर्वसाधारण सभेमध्ये होणार आहे. पाणीपट्टीवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप होत आहेत, याविषयी आयुक्तांनी भूमिका मांडली.
ते म्हणाले, ‘पाणीपुरवठ्यावर जेवढा खर्च होतो. तेवढे उत्पन्न अपेक्षित असते. त्या हेतूने पाणीपट्टी दरवाढ प्रस्तावित केली होती. पाणीगळती रोखण्यावर भर देण्यात येणार आहे. भामा-आसखेड धरणातून पाणी आणने, पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पातून पाणी आणण्याची योजना मार्गी लावणे गरजेचे आहे. त्यासाठी सुमारे सहाशे कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पाण्यासाठी सहाशे कोटींची गुंतवणूक करावी लागणार आहे.’’