वाढीव बिलांमुळे उडाली झोप

By admin | Published: March 27, 2017 02:32 AM2017-03-27T02:32:33+5:302017-03-27T02:32:33+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांतील मिळकतकर रद्द असताना ताथवडे गावाचा समावेश केवळ

Increased bills cause sleep problems | वाढीव बिलांमुळे उडाली झोप

वाढीव बिलांमुळे उडाली झोप

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांतील मिळकतकर रद्द असताना ताथवडे गावाचा समावेश केवळ आदेशात नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ताथवडेतील नागरिकांना करमाफीचा विषय राज्य शासनाकडे प्रलंबित असताना महापालिकेकडून सक्तीने करवसुली मोहीम सुरू केली आहे. ताथवडे परिसरातील मिळकतींना शासनाच्या धोरणानुसार मिळकतकर माफी देण्यात यावी, याबाबत नागरिकांनी आयुक्त दिनेश वाघमारे यांना पत्र दिले आहे.
३० जुलै २००९ मध्ये ताथवडेचा पालिकेत समावेश करताना कमीत कमी कर आकारला जाईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते. शासनाच्या निर्णयानुसार १९९७ मध्ये महापाालिकामध्ये समाविष्ट झालेल्या मिळकतकर थकबाकीमध्ये करमाफी देण्यात आली आहे. ताथवडे गावाचा समावेश नंतर झाल्यामुळे संबंधित निर्णयामध्ये गावाचा समावेश नाही.
२०१५-१६ या आर्थिक वर्षाकरिता महानगरपालिकेने मिळकतकराचे दर निश्चित केले. त्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी उपसूचना सादर केली होती. १९९७ मध्ये समाविष्ट झालेल्या गावांना करमाफी दिली. त्याप्रमाणे ताथवडेचाही विचार करावा, म्हणून ठराव करून तत्कालीन आयुक्त यांनी नगरविकास विभागाकडे पाठविला. त्यावर शासनाने निर्णय दिलेला नाही. प्रशासनाने करवसुली सुरू केली. वाढीव मिळकतकरांची बिले पाहून नागरिकाचे डोळे पांढरे झाले आहेत. तसेच जप्तीच्याही नोटिसा दिल्या आहेत. (प्रतिनिधी)

मिळकतकरात दिली होती सवलत
मयूर कलाटे म्हणाले, ‘‘पूर्वीच्या १७ गावांचा समावेश पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात करण्यात आला. त्या वेळी मिळकत करातून सवलत दिली होती. ताथवडेचा समावेश केला त्या वेळी महानगरपालिका अधिनियम कलम १२९अ नुसार गावाचा महापालिकेत समावेश करण्यात येईल. त्या वेळी कमी दरात सामान्यकर आकारणी केली जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, वाढीव दराच्या बिलांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. त्यातच जप्तीच्या नोटिसाही दिल्या आहेत. ताथवडे गावातील मिळकती आकारलेल्या करातून माफी द्यावी. यावर महापालिका आणि राज्य शासनाने निर्णय घ्यावा.’’

Web Title: Increased bills cause sleep problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.