Pavana Dam: सावधान! पवना धरणातून विसर्ग वाढविला ३२०० क्युसेक पाणी सोडले; सायंकाळी आणखी वाढविणार
By विश्वास मोरे | Updated: August 2, 2024 14:13 IST2024-08-02T14:13:04+5:302024-08-02T14:13:29+5:30
पाणलोट क्षेत्रात होणा-या पावसाच्या प्रमाणानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी, जास्त करण्यात येईल

Pavana Dam: सावधान! पवना धरणातून विसर्ग वाढविला ३२०० क्युसेक पाणी सोडले; सायंकाळी आणखी वाढविणार
पिंपरी : मावळातील पवना धरण सद्यस्थितीत ९२ टक्के भरलेले असून पावसाचा जोर कायम आहे. धरणाच्या सांडव्यावरून १८०० क्युसेक जलविद्युत केंद्रामधून विदुयतगृहाद्वारे १४०० क्युसेक असा एकुण ३२०० क्युसेक इतक्या क्षमतेने नदीपात्रात विसर्ग सुरु आहे. त्यात वाढ होणार आहे.
पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढलेला असून पाणी पातळीत वाढ विचारात घेता धरणातील पाणीसाठा नियंत्रित करणेकरिता शुक्रवारी तीन वाजता सांडव्यावरून विसर्ग वाढवून ३६०० क्युसेक इतक्या क्षमतेने नदीपात्रात विसर्ग करण्यात येणार आहे. नदी पात्रामध्ये एकुण पाच हजार क्युसेक क्षमतेने विसर्ग होणार आहे.
पाणलोट क्षेत्रात होणा-या पावसाच्या प्रमाणानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी, जास्त करण्यात येईल. पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत, सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात, सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेत जलसंपदा विभागास/प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.