प्रचारासाठी नातीगोती झाली सक्रिय

By admin | Published: February 15, 2017 02:04 AM2017-02-15T02:04:46+5:302017-02-15T02:04:46+5:30

मावळ पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूकांचे बिगूल वाजले असून, प्रचाराला केवळ सहा दिवसांचा अवधी राहिला असल्याने

Incredancies became active for the campaign | प्रचारासाठी नातीगोती झाली सक्रिय

प्रचारासाठी नातीगोती झाली सक्रिय

Next

लोणावळा : मावळ पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूकांचे बिगूल वाजले असून, प्रचाराला केवळ सहा दिवसांचा अवधी राहिला असल्याने उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला आहे. नात्यागोत्यातील मंडळी प्रचार कामात सक्रिय झाली आहेत. घरातील कामे सकाळी लवकरच उरकून ही मंडळी प्रचारासाठी गळ्यात पट्टा अडकवत सज्ज होत आहेत.
मावळ तालुका हा भौगोलिक वाड्या-वस्त्यांचा व दुर्गम भागाचा असल्याने मतदारसंघ दूरवर पसरलेले आहेत. मतदारसंघातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे उमेदवाराला शक्य नसल्याने नात्यागोत्यातील मंडळींनी राजकारण बाजूला ठेवत प्रचारकार्यात उडी घेतली आहे. घरोघरी जाऊन प्रचारपत्रके वाटप करणे, भित्तिपत्रके चिकटवणे ही कामे बालचमू मोठ्या उत्साहात करत आहेत. अमुकतमुक हा आपला नातेवाईक आहे. या वेळी पक्ष व राजकारण बाजूला ठेवत नात्यातील मंडळीला मदत करा. शेवटी आपले ते आपले असते, असे सांगायला देखील नातेवाईक विसरत नसल्याने नात्यागोत्यातील राजकारणाला मावळात मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. नातेवाइकांप्रमाणेच गावकी व भावकीदेखील प्रचारात सहभागी झाली असल्याचे चित्र आहे. पक्ष कोणता का असेना, उमेदवार आपल्या गावातील आहे. आपल्या हाकेला तो केव्हाही धावू शकतो हा विचार मनात धरत सध्या गावकीचा प्रचार सुरू आहे. याकरिता अनेक राजकीय पक्षांनीदेखील उमेदवार निवडताना मोठ्या गावांना, तसेच मोठी भावकी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले आहे.
सोशल मीडिया प्रचाराचे सर्वांत वेगवान साधन
डिजिटायझेशनच्या जमान्यात सोशल मीडिया हे प्रचाराचे सर्वांत मोठे साधन बनले आहे. या प्रचारावर निवडणूक आयोगाची देखील खूपच कमी बंधने नसल्याने याचा मोठ्या प्रमाणात वापर करत उमेदवार घराघरांत पोहोचले आहेत. सोशल मीडियावर सातत्याने उमेदवार व त्यांचे विचार किती महान आहेत, याची माहिती देणारे बॅनर कार्यकर्ते पाठवत आहेत. सध्या सर्वच उमेदवारांनी स्वत:चा सोशल मीडिया सेल तयार केला असून, ज्या भागात प्रचार सुरू आहे, तेथील प्रचाराची छायाचित्रे व गर्दीचे फोटो तातडीने सोशल मीडियावर पाठवत आपल्या उमेदवाराला किती जनाधार आहे हे दाखविले जात आहे. सोमवारी सर्व उमेदवारांना चिन्ह मिळाल्याने उमेदवाराचे चिन्ह घरोघरी पोहचविण्याचे महत्त्वाचे कार्य सोशल मीडिया सेल पार पाडत आहे. (वार्ताहर)

Web Title: Incredancies became active for the campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.