इंडियन ऑईलची गेल्या तीन वर्षातील उच्चांकी कमाई, बावीस हजार कोटींचा नफा कमावला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 10:46 AM2021-05-21T10:46:15+5:302021-05-21T10:52:32+5:30

एकूण महसुली उत्पन्न घटूनही नफ्यात वाढ

Indian Oil's highest revenue in the last three years is Rs 22,000 crore | इंडियन ऑईलची गेल्या तीन वर्षातील उच्चांकी कमाई, बावीस हजार कोटींचा नफा कमावला

इंडियन ऑईलची गेल्या तीन वर्षातील उच्चांकी कमाई, बावीस हजार कोटींचा नफा कमावला

Next
ठळक मुद्देगत आर्थिक वर्षाच्या तुलनेत नफ्यात २० हजार ५२३ कोटी रुपयांनी वाढ

पिंपरी: देशातील सर्वात मोठी ऑईल उत्पादक कंपनी असलेल्या इंडियन ऑईलने मार्च २०२१ अखेरीस संपलेल्या आर्थिक वर्षात २१ हजार ८३६ कोटी रुपयांचा घसघशीत नफा कमावला आहे. गत आर्थिक वर्षाच्या तुलनेत नफ्यात २० हजार ५२३ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या तीन आर्थिक वर्षातील ही उच्चांकी कमाई ठरली आहे. इंडियन ऑईलचे चेअरमन श्रीकांत वैद्य यांनी नुकताच इंडियन ऑईलचा ताळेबंद जाहीर केला.

एप्रिल ते मार्च २०२१ या आर्थिक वर्षात ५ लाख १४ हजार ८९० कोटी रुपयांचे महसुली उत्पन्न जमा झाले. मार्च २०२० रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात ५ लाख ६६ हजार ३५४ कोटी रुपयांचे महसुली उत्पन्न मिळाले होते. महसुली उत्पन्न पन्नास हजार कोटी रुपयांवरून घटूनही नफ्यात मोठी वाढ झाली आहे. मार्च २०२० अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात १ हजार ३१३ कोटी नफा झाला होता. त्यात २१ हजार ८३६ कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.

पेट्रोकेमिकल उत्पादनांमध्ये अधिक नफा मिळाल्याने एकूण नफ्यात वाढ झाली आहे. एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या काळातील पहिल्या तिमाहीत १ हजार ९११ कोटी रुपयांचा नफा झाला. या तिमाहीत कोरोनाचे निर्बंध कडक असल्याने त्याचा परिणाम ताळेबंदावर दिसून येत आहे. सप्टेंबर २०२० अखेर संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत ६ हजार २२७ आणि डिसेंबर २०२० अखेरीस संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत ४ हजार ९१७ कोटींचा नफा कमावला. तर, मार्च २०२१ अखेर संपलेल्या चौथ्या तिमाहीत सर्वाधिक ८ हजार ७८१ कोटी रुपयांची कमाई केली.

कंपनीने मिळवलेला नफा 

(रक्कम कोटी रुपये) 
२०१८-१९ - १६,८९४ 
२०१९-२० - १,३१३ 
२०२०-२१ - २१,८३६ 

म्हणून वाढला नफा

मार्च २०२० अखेरीस संपलेल्या आर्थिक वर्षात प्रति बॅरल ढोबळ नफा ०.०८ डॉलर होता. त्यात मार्च २०२१ मध्ये तब्बल ५.६४ डॉलरची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण नफा वाढल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Indian Oil's highest revenue in the last three years is Rs 22,000 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.